Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Wedding: अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा विवाह, मोबाईल फोन वापरण्यासही बंदी- Reports 
Jasprit Bumrah, Sanjana Ganesan (Photo Credits: Instagram/Jasprit Bumrah, Sanjana Ganesan)

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) लग्नाची बातमी समोर आल्यापासून त्याच्या भावी पत्नीबाबत अनेक कयास बांधले जात आहेत. यापूर्वी बातमी आली होती की जसप्रीत साऊथची अभिनेत्री अनुपमाशी लग्न करणार आहे. मात्र आता बुमराह स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) लग्न करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री तारा शर्माने जसप्रीत आणि संजनाच्या लग्नाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार बुमराह 14 मार्च रोजी म्हणजे रविवारी स्पोर्ट्स अँकर संजना गणेशसह गोव्यात सप्तपदी चालणार आहे. महत्वाचे म्हणजे या सोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बुमराहच्या लग्नात 20 हून अधिक पाहुणे सहभागी होणार नाहीत. सध्या कोरोनाच्या काळात हे लग्न होणार असल्याने जास्त लोकांना शारीरिकदृष्ट्या यामध्ये आमंत्रित केले जाणार नाही. एवढेच नाही तर लग्नाच्या सोहळ्यात कोणालाही मोबाइल आपल्यासोबत बाळगण्याची परवानगी दिली जाणार नाही. बुमराह आणि संजनाला आपल्या लग्नाचा समारंभ अतंत्य खाजगी ठेवायचा आहे. मात्र आतापर्यंत या दोघांकडूनही लग्नाच्या वृत्ताबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

तारा शर्माने एक फोटो शेअर केला आहे, जसप्रीत बुमराहने नुकतेच तारा शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तो आपली क्रिकेट कारकीर्द आणि संघर्षांबद्दल बोलला. या शोनंतर, ताराने जसप्रीतचे शोवर आल्याबद्दल आभार मानले आणि संजना गणेशनसोबत होत असलेल्या लग्नाबद्दल शुभेच्छाही दिल्या. उल्लेखनीय म्हणजे बुमराह चौथ्या आणि अंतिम कसोटी तसेच इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेमधून बाहेर पडला होता. यामागे त्याचे लग्न हेच कारण असावे असा अनेकांना अंदाज आहे. (हेही वाचा: Harbhajan Singh आणि Geeta Basra पुन्हा होणार आई-बाब; गीताने खास फॅमिली फोटोच्या माध्यमातून शेअर केली गूडन्यूज (See Pics)

दरम्यान, संजना गणेशनबद्दल बोलायचे झाले तर, ती साधारण 28 वर्षांची आहे आणि तिचा जन्म पुण्यात झाला आहे. संजनाने पुणे विद्यापीठातूनच अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. त्यानंतर ती मॉडेलिंगच्या दुनियेत आली. 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनलमध्येही पोहोचली होती. याआधी, गणेशनने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचा किताब जिंकला आहे. यासह तिने एमटीव्हीचा रिअॅलिटी शो स्पिलिट्स व्हिलाद्वारे टीव्हीवर डेब्यू केला होता. आता संजना गणेशन क्रिकेट चाहत्यांना क्रीडा अँकर म्हणून परिचित आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल 2020 दरम्यान ती टीव्हीवर बरीच दिसली होती.