Harbhajan Singh आणि Geeta Basra पुन्हा होणार आई-बाब; गीताने खास फॅमिली फोटोच्या माध्यमातून शेअर केली गूडन्यूज ( See Pics)
Geeta Basra and Harbhajan Singh (Photo credit: twitter)

अभिनेत्री गीता गीता बसरा (Geeta Basra) आणि भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) पुन्हा आई-बाबा होणार आहेत. आज 37 वर्षीय गीता गीता बसरा हीने सोशल मीडीयामध्ये खास फोटो पोस्ट करत ही गूडन्यूज शेअर केली आहे. दरम्यान या दांपत्याला 4 वर्षांची मुलगी Hinaya Heer Plaha आहे. हिनायाच्या हातामध्ये एक छोटसं टीशर्ट, त्यावर लवकरच मोठी बहीण होणार असा मेसेज लिहलेला फोटो गीताने शेअर केला आहे. दरम्यान हा फोटो गीताने सोशल मीडीयावर शेअर करताना 'कमिंग़ सून जुलै 2021' अशी कॅप्शन लिहीत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे.

गीता बसरा इम्रान हश्मी सोबत 'द ट्रेन' सिनेमामध्ये झळकली होती. त्यानंतर 2015 साली गीता आणि भारतीय क्रिकेट संघातील स्पिनर हरभजन सिंह सोबत जालंधर मध्ये विवाहबद्ध झाली. Fan's Congratulate Virat-Anushka: विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.

गीता बसरा ची पोस्ट

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर हरभजन देखील आता रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 40 वर्षीय हरभजनने 2019 साली Dikkiloona या तमिळ सिनेमातून पदार्पणाची खूषकहबर शेअर केली होती तर तो तमिळ स्पोर्ट्स कॉमेडी 'फ्रेंडशिप' मध्ये देखील दिसणार आहे. गीता लग्नानंतर सिनेमापासून दूर राहिली आहे. काल 13 मार्च दिवशीच गीताने तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला आहे.