Fan's Congratulate Virat-Anushka: विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushaka Sharma) कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushaka Sharma) कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विराटने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आज 11 जानेवारी 2021 रोजी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये (Breach Candy Hospital) अनुष्काने बाळाला जन्म दिला आहे. यानंतर बॉलिवूड आणि क्रिडा विश्वासह त्यांच्या चाहत्यांनीही ट्विटर (Twitter), फेसबूक (Facebook), इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
"आम्हा दोघांना हे सांगण्यास आनंद होत आहे की, आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. तुमच्याकडून मिळालेले प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही सुखरुप आहेत. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचे सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे", असे ट्विट विराट कोहलीने केले आहे. हे देखील वाचा- विराट कोहली, अनुष्का शर्मा च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन
ट्वीट-
It's baby girl 😍🥳for Anushka Sharma❤️ and Virat Kohli❤️..All loves to them❤️❤️❤️👍🏼😍 pic.twitter.com/6QcbuLF1WX
— Hariviknesh Subramaniam (@harryece) January 11, 2021
ट्वीट-
The moment when u realized That
Virat & Anushka Blessed with a Baby Girl ...🥺 ❤️ pic.twitter.com/I6faWKTkvY
— @imRakeshNani (@imRakeshNani) January 11, 2021
ट्वीट-
This is your Dad's Pavilion princess 😇#virushka pic.twitter.com/gExGhJ5e9s
— Gaurav Chavan (@ChavanGaurav18) January 11, 2021
ट्वीट-
And finally they are three😍🥺🥳🥳congrats it's a princess Anushka 2.0🥳🥳🥳stay happy ✨✨✨💜💜@imVkohli @AnushkaSharma #virushka pic.twitter.com/92wS5lQcAK
— Arpita_♡ (@VDholicAppu) January 11, 2021
अनुष्का सध्या मॅटर्निटी लिव्ह वर आहे. अनुष्का मे 2021 पर्यंत पुन्हा कामाला सुरूवात करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान विरूष्काच्या आयुष्यात 11 तारीख ही खास ठरली आहे. 11 डिसेंबर 2017 ला ते दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर आज त्यांच्या मुलीचा जन्म झाला आहे. विराट देखील सध्या ब्रेकवर आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये क्रिकेट संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2021 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

