![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/12/england-squad.jpg?width=380&height=214)
Jacob Bethell Ruled Out From Champions Trophy: इंग्लंडला दुस-यांदा मोठा धक्का बसला आहे. पहिल्यांदा, इंग्लंड टीमला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि आता असे सांगण्यात येत आहे की, तरुण प्रतिभावंत खेळाडू जेकब ग्रॅहम बेथेल 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने याची पुष्टी केली आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अद्याप जेकब बेथेलच्या जागी कोणाचीही घोषणा केलेली नाही. तथापि, भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी बेथेलच्या कव्हर म्हणून टॉम बँटनला बोलावण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी बेथेलची जागा बॅंटनला दिली जाईल. बोर्डाने अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या जागी कोण असेल याची घोषणा केलेली नाही.
21 वर्षीय जेकब बेथेलने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आणि गोलंदाजीतही एक विकेट घेत चांगली कामगिरी केली होती. यानंतर, दुखापतीमुळे तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर जॉस बटलरने सांगितले की, बेथेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही.
उद्या शेवटची तारीख
उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत, सर्व संघ आयसीसीच्या नियमानुसार 11 फेब्रुवरीपर्यन्त सर्व संघाना अधिकृत संघाची घोषणा करणे अनिवार्य आहे. परवानगीशिवाय त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल करू शकतात. अशा परिस्थितीत, इंग्लंड मंगळवारी जेकब बेथेलच्या जागी खेळाडूची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. बेथेलच्या जागी अष्टपैलू सॅम करनला संघात स्थान मिळू शकते अशी चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये सॅम करनने शानदार कामगिरी केली होती.
आयपीएल 2025 मध्ये खेळण्याबाबत सस्पेन्स
आयपीएल 2025 च्या लिलावात जेकब बेथेलला आरसीबीने 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले होते. बेथेल अद्याप आयपीएलमधून बाहेर पडलेला नाही, परंतु त्याला लीगमध्ये खेळणे कठीण मानले जात आहे. आयपीएल 2025 हे 21 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.