
Ishan Kishan: भारताचा धडाकेबाद इशान किशन (Ishan Kishan) हा देशातील सर्वोत्तम विकेटकीपर-फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो भारतीय संघासाठी तिन्ही स्वरूपात खेळला आहे. २०२३ च्या आशिया कप आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तो टीम इंडियाच्या संघाचा भाग होता. तथापि, त्यानंतर अनेक घटना घडल्या, ज्यामुळे त्याला संघातून काढून टाकण्यात आले आणि बीसीसीआयने त्याचा केंद्रीय करार रद्द केला. त्याची कारकीर्द दोन टोकांमधील प्रवास दर्शवते—एक अविश्वसनीय उदय आणि त्यानंतर अचानक आलेली मोठी घसरण. (हे देखील वाचा: BCCI Central Contract 2025: एखाद्या खेळाडूला बीसीसीआयच्या केंद्रीय करारात कसे मिळते स्थान? जाणून घ्या अटी आणि शर्ती)
Ishan Kishan’s rise and fall :
2016: Captained India U19 in World Cup; finished as runner-up.
2016–2020: Starred in domestic cricket for Jharkhand; smashed 273 vs Delhi in Ranji Trophy.
2021: Made India debut, T20I vs England, ODI vs Sri Lanka.
2022: Hit record-breaking 210 vs… pic.twitter.com/bdGWB2MXDg
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) October 6, 2025
प्रारंभ आणि विक्रमी झेप (२०१६ - २०२३)
ईशान किशनने आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात २०१६ मध्ये केली, जेव्हा त्याने भारताच्या १९ वर्षांखालील (U19) संघाचे कर्णधारपद भूषवले आणि संघाला विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून दिले. याच काळात, २०१६ ते २०२० पर्यंत त्याने झारखंडसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषतः रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीविरुद्ध ठोकलेले त्याचे २७३ धावांचे द्विशतक लक्षणीय होते.
बांगलादेशविरुद्ध २१० धावांची विक्रमी खेळी
त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला २०२१ मध्ये भारतीय संघात संधी मिळाली आणि त्याने इंग्लंडविरुद्ध टी-२० तसेच श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, २०२२ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च शिखर ठरले. त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना २१० धावांची विक्रमी खेळी केली, ज्यामुळे तो सर्वात जलद एकदिवसीय द्विशतक ठोकणारा आणि सर्वात युवा द्विशतकवीर बनला. २०२३ मध्ये तो आशिया कप विजेत्या आणि एकदिवसीय विश्वचषक उपविजेत्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता आणि जुलैमध्ये त्याने कसोटी पदार्पणही केले.
वाद आणि अनिश्चितता
डिसेंबर २०२३ मध्ये, ईशान किशनच्या कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला. त्याने मानसिक थकव्याचे (Mental Fatigue) कारण देत दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडला. मात्र, याच दरम्यान तो दुबईमध्ये पार्ट्या करताना आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला. या वादामुळे २०२४ मध्ये त्याला मोठी किंमत मोजावी लागली. बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातून (Central Contract) बाहेर केले. यानंतर ईशानने आपण 'गैरसमज' (Misunderstood) आणि 'बाजूला टाकल्याचे' (Sidelined) वाटत असल्याचे विधान केले. २०२४-२०२५ मध्ये तो तिन्ही फॉरमॅटमधून वगळला गेला, इतकेच नव्हे तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी देखील त्याची निवड झाली नाही.
मुंबईसंघाने सोडली साथ
किती वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खेळणार ईशान किशनला मुंबईने सोडून दिले. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबाद त्याला विकत घेतले. (SRH) साठी खेळताना त्याने शतकाने सुरुवात करून पुनरागमनाचे संकेत दिले, परंतु त्यानंतर त्याचा फॉर्म पुन्हा ढासळला. अखेर, २०२५ मध्ये बीसीसीआयने त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात येण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे.
प्रचंड प्रतिभा , पण...
दरम्यान, बीसीसीआयच्या २०२४-२५ केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या त्याला हंगामासाठी 'ग्रेड सी' मध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे त्याला वार्षिक पगार ₹१ कोटी मिळतो. सध्या ईशान किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून पूर्णपणे दूर आहे. त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिभा असली तरी, अनिश्चितता आणि फॉर्ममधील चढ-उतारामुळे त्याचे भारतीय संघातील भविष्य अजूनही अनिश्चित आहे.