रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इसरू उडाणाला 50 लाखच्या किंमतीत संघात समाविष्ट केले. 

ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन 4 कोटीला विकलारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने डेल स्टेनला त्यांच्या दोन कोटींच्या बेस प्राइसवर खरेदी केले आहे. गेल्या वर्षीदेखील स्टेन बेंगलोर संघाकडून खेळला होता, पण दुखापतीमुळे नंतर त्याला माघार घ्यावी लागली. 

टॉम करणला राजस्थान रॉयल्सने एक कोटीत विकत घेतले.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 4 कोटींमध्ये खेळणार असून त्याने आरसीबीसाठी 2016 मध्ये शेवटचा आयपीएल खेळला होता.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 3 कोटी रुपयांत विकत घेतले आहे. त्याची बेस प्राईस फक्त 75 लाख रुपये होती. यापूर्वी तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य होता.

टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिकेदरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली ला चिडवणाऱ्या केसरिक विल्यम्स ला लिलावात खरेदीदार मिळाला नाही. 

दुसर्‍या फेरीत मार्कस स्टोइनिसला दिल्लीच्या कॅपिटलने 4.80 कोटी किंमतीला विकत घेतले.

तुषार देशपांडे यांना दिल्ली कॅपिटल्सने 20 लाखांच्या बेस प्राइसमध्ये खरेदी केले आहे.

प्रभसिमरन सिंहला किंग्ज इलेव्हन पंजाबने 55 लाखात खरेदी केले.

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अ‍ॅन्ड्र्यू टाय यांना कोणताही खरेदीदार मिळालेला नाही.

Load More

आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-20 लीग इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 साठी या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आज दुपारी कोलकाता येथे हा लिलाव होणार आहे. कोलकातामध्ये लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएलच्या (IPL) 13 व्या सत्रात 971 खेळाडूंनी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लिलावाच्या अंतिम यादीमध्ये 332 खेळाडूंचा समावेश केला. या लिलावात अफगाणिस्तानचा नूर अहमद सर्वात तरुण खेळाडू आहे, तर 48 वर्षीय प्रवीण तांबे सर्वात जुने खेळाडू आहे. या खेळाडूंची यादी सर्व फ्रेंचायझींना देण्यात आली आहे. यावेळी लिलावात एकूण 186 भारतीय खेळाडू आहेत, तर 143 विदेशी खेळाडू असतील. यातील तीन खेळाडू सहकारी देशांचे आहेत. यावेळी लिलावाद्वारे एकूण 73 रिक्त जागा भरल्या जायच्या आहेत.

यंदाच्या लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध खेळाडूंसह अनेक प्रतिभावान युवा खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. विश्वचषक विजेता कर्णधार इयन मॉर्गन, रॉबिन उथप्पा, जेसन रॉय, डेल स्टेन यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील मेरठच्या प्रियाम गर्ग याच्यासह 19 वर्षांखालील अन्य भारतीय संघातील खेळाडूंसाठी लिलावात मोठी बोली लागणे अपेक्षित आहे. प्रियमशिवाय हापूरचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी, मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल यानाही लिलावात मोठी रक्कम मिळू शकते. यावेळी बोलीची सर्वाधिक राखीव किंमत 2 कोटी आहे, त्यातील सर्व सात खेळाडू परदेशी आहेत. दोन कोटींच्या स्लॅबमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. लिलावात भारतीय खेळाडूंपैकी उथप्पा दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात महागड्या 1 कोटींच्या स्लॅब आहे. रॉबिननंतर एक कोटींच्या स्लॅबमध्ये भारतीय स्टार पियुष चावला, युसूफ पठाण आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. 20 लाख किंमतीच्या स्लॅबमध्ये देशांतर्गत खेळाडूंमधील 183 खेळाडू, 40 लाखांच्या बेस प्राइस स्लॅबमध्ये सात खेळाडू (एक भारतीय आणि सात परदेशी) असून 30 खेळाडूंच्या बेस प्राइस स्लॅबमध्ये आठ खेळाडू (पाच भारतीय आणि तीन परदेशी) आहेत.