आयपीएल लिलाव 2021 (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी लवकरच मेगा लिलाव होणार आहे, असे संकेत बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह यांनी शनिवारी दिले. तरीही त्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. आयपीएल (IPL) 2022 च्या मेगा लिलावात यंदा अनेक मोठ्या खेळाडूंच्या नशिबाचा निर्णय होणार आहे. या दरम्यान घरगुती सर्किटमध्ये चमकलेले अनेक अनकॅप्ड खेळाडू देखील यंदाच्या लिलावात आपला दबदबा निर्माण करू शकतात. भारतात नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) 2021-22 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यानंतर आता हे खेळाडू लिलावात उतरतील. सर्व आयपीएल फ्रँचायझी या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी उत्सुक असतील. (IPL 2022: आकाश चोप्रा यांची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ खेळाडू मेगा लिलावात 20 कोटींहून अधिकची करू शकतो कमाई, ठरेल सर्वात महागडा)

1. किशन लिंगदोह (Kishan Lyngdoh)

मेघालयचा फलंदाज किशन लिंगदोहला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात विकत घेतले जाऊ शकते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 5 सामन्यात 247 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक-रेट 142.77 होता. तर सरासरी 61.47 होती. त्रिपुराविरुद्ध त्याने सर्वाधिक 8 धावा केल्या.

2. अक्षय कर्णेवार (Akshay Karnewar)

सर्व आयपीएल फ्रँचायझींची नजर 29 वर्षीय अक्षय कर्णेवारवर असेल. विदर्भाकडून खेळणाऱ्या अक्षयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 13 गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 4.34 होता, जो टी-20 च्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो. याशिवाय अक्षय कर्णेवारने मणिपूरविरुद्ध 4 षटकात एकही धाव दिली नाही आणि 2 विकेट घेतल्या. तर सिक्कीमविरुद्ध त्याने हॅट्ट्रिकही घेतली.

3. अश्विन हेब्बर (Ashwin Hebbar)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशचा फलंदाज अश्विन हेब्बरने शानदार फलंदाजी करताना पाच सामन्यांत 279 धावा चोपल्या. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 93.00 होती. आणि नाबाद 103 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने 5 सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. हेब्बर आयपीएल 2022 मेगा लिलावातही चमकू शकतो.

4. दर्शन नालकंडे (Darshan Nalkande)

आयपीएल 2022 मेगा लिलावात 23 वर्षीय दर्शन नळकांडेमध्ये देखील अनेक संघ रस दाखवू शकतात. विदर्भाकडून खेळणाऱ्या नळकांडेने यंदा मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 13 विकेट घेतल्या होत्या. कर्नाटकविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने शेवटच्या षटकातील चार चेंडूत सलग चार विकेट घेतल्या. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये लसिथ मलिंगा, राशिद खान आणि कर्टिस कान्फर यांनी सलग चार चेंडूत चार विकेट घेतल्या आहेत.

5. तन्मय अग्रवाल (Tanmay Agarwal)

हैदराबादच्या तन्मय अग्रवालने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने स्पर्धेच्या सात सामन्यांत 55.66 च्या सरासरीने 334 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 148.48 होता. उत्तराखंडविरुद्ध त्याचे शतक तीन धावांनी हुकले, मात्र संघ उपांत्य फेरीत पोहोचला. तो आयपीएल 2017 आणि 2018 मध्ये हैदराबाद संघाचा भाग होता पण त्याला कोणतीही संधी न देता रिलीज करण्यात आले.