टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात (Photo Credit: Twitter/BCCI)

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाची भूमिका बजावत असलेल्या आकाश चोप्राने  (Aakash Chopra) शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 हंगामापूर्वी मेगा लिलावासाठी एक मोठी भविष्यवाणी केली आणि या लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर दाव लावला आहे. आकाशने भारतीय सलामीवीर केएल राहुलचे (KL Rahul) नाव घेतले आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान आकाशने ही माहिती दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने रांची येथे दुसरा टी-20 सामना सात विकेटने सहज खिशात घातला. काही अहवालांनुसार राहुल आयपीएल (IPL) 2022 च्या पूर्वी पंजाब किंग्जचे (पीबीकेएस) कर्णधारपद सोडण्याच्या विचारात आहे आणि जर भारताच्या सलामीवीराने स्वत:ला लिलाव पूलमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला तर फ्रँचायझी नक्कीच राहुलला आपल्या संघात सामील प्रयत्न करतील कारण राहुल एक उत्कृष्ट फलंदाज आणि संघाचे नेतृत्वही करू शकतो. (IPL 2022 Auction: आयपीएल लिलावात ‘हा’ असणार मोस्ट वॉन्टेड खेळाडू, माजी भारतीय दिग्गज फलंदाजाचे मोठे भाष्य)

आयपीएल 2022 मध्ये लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी जोडल्या जाणार आहेत आणि या दोन्ही फ्रँचायझी 29 वर्षीय राहुलला संघात सामील करू पाहत असतील. चोप्राच्या म्हणण्यानुसार, खर्चाची मर्यादा नसल्यामुळे तो कदाचित 20 कोटींपेक्षा अधिकची लिलावात कमाई करू शकतो. “जर केएल राहुल लिलावात आला…आणि जर ड्राफ्ट सिस्टमने खेळाडूच्या पगारावर कमाल मर्यादा घातली नाही तर… तो आगामी लिलावात सहजपणे सर्वात महागडा खेळाडू होईल. 20 कोटी +.” चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली.

उल्लेखनीय आहे की न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात राहुलने फक्त 36 चेंडूत 65 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. राहुलने कर्णधार रोहितसोबत येथे पहिल्या विकेटसाठी 13.2 षटकांत 117 धावा केल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिलने शानदार सुरुवात करूनही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 20 षटकांत एकूण 153/6 धावसंख्येवर रोखले. गप्टिलला 31 धावांवर दीपक चाहरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन या भारतीय फिरकी जोडीने त्यानंतर ब्लॅककॅप्स विरोधात सामन्यावर संघाची पकड मजबूत केली. नवोदित हर्षल पटेलने डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सचे विकेट घेत चेंडूने प्रभाव पाडला.