IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान रोहितने अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. यापैकी मुख्य म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची दुखापत. पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्स आधीच त्यांच्या स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे बॅकफूट वरून मोहिमेची सुरुवात करणार आहे, जो अद्याप संघाच्या बबलमध्ये सामील नाही. रविवार, 27 मार्च रोही होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पहिल्या सामन्याला यादव मुकणार असल्याची पुष्टी रोहितने नुकत्याच आभासी मीडिया कॉन्फरन्समध्ये केली. वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान 31 वर्षीय सूर्यकुमारला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आणि त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेतूनही बाहेर पडला. (IPL 2022 मध्ये ‘हे’ 5 खेळाडू ठरवणार मुंबई इंडियन्सचे भवितव्य, यावेळी नवीन रूप-रंगात दिसणार संघ)
रोहित म्हणाला, “सूर्या एनसीएमध्ये आहे. एनसीएकडून मंजुरी मिळाल्यावर तो आमच्यात सामील होण्याची आम्ही वाट पाहत आहोत.” अशा परिस्थितीत आता हैदराबादचा फलंदाज टिळक वर्मा यादवच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याचा मुख्य दावेदार आहे. “टिळक हा प्रचंड प्रतिभावान आहेत, त्याच्यात खूप क्षमता आहे. हे त्याच्यासाठी शिकण्याबद्दल आहे आणि आम्ही संघातील सर्व युवा खेळाडूंना शिक्षित करण्याचा प्रयत्न करू,” श्रीलंकेचे माजी कर्णधार आणि MI चे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले. दुसरीकडे, हार्दिक पांड्याबद्दल रोहित म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या यशात हार्दिकचा खूप मोठा वाटा होता आणि त्याने आमच्या यशात मोठी भूमिका बजावली. त्याच्यासाठी दुसऱ्या फ्रँचायझीचा कर्णधार बनणे वेगळे आव्हान असेल.” हार्दिक यावर्षी गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून प्रथमच आयपीएल खेळणार आहे.
🚨 PRESS CONFERENCE TIME 🚨
Rohit Sharma & Mahela Jayawardene are here to address the press in this season's first PC! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/yM2C14W5CS
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
दुसरीकडे, रोहितने वर्कलोडच्या प्रशांवर देखील मौन सोडले. रोहित त्याच्या वर्कलोडवर रोखठोक मत प्रदर्शित करत म्हटले की, “मला सर्व सामने खेळायचे आहेत, म्हणूनच मी अजूनही येथे आहे. मी सर्व सामने खेळेन आणि प्रत्येक गेममध्ये फरक करण्याचा प्रयत्न करेन. जर काही चिंता असेल तर आम्ही त्याचे निराकरण करू.” रोहित कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हंगामात मुंबई लीग फेरीतून बाहेर पडली होती.