टीम इंडियाचे (Team India) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना वाटते की पंजाब किंग्जचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) गेल्या तीन हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पुनरागमन करेल आणि राष्ट्रीय टी-20 मध्ये स्थान मिळवू शकेल. अर्शदीपने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि गेल्या चार हंगामांपासून तो पंजाब किंग्ज संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. आयपीएल (IPL) 2022 लिलावापूर्वी फ्रँचायझीने राखून ठेवलेल्या दोन खेळाडूंमध्ये अर्शदीप एक होता. 23 वर्षीय वेगवान गोलंदाजाने नवीन चेंडूने आपल्या खेळात सुधारणा केली, तर या हंगामातही तो ‘डेथ ओव्हर्स‘मध्ये चमकदार गोलंदाजी करत आहे. (Ravi Shastri on Virat Kohli: बस झालं...‘विराट कोहली खूप खचला आहे’, शास्त्री गुरुजींचं मोठं वक्तव्य; आणखी 6-7 वर्षे खेळण्यासाठी ‘हे’ करण्यास सांगितले)
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना, गेल्या तीन हंगामात आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर अर्शदीप लवकरच राष्ट्रीय T20 संघात प्रवेश करू शकतो असे मत प्रदर्शित केले. “एक खेळाडू जो खूप तरुण आहे आणि दबावाच्या परिस्थितीत सातत्याने चांगली कामगिरी करतो. हे पाहणे अद्भूत आहे. दबावातही तो शांत राहतो आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करतो.” ते पुढे म्हणाले, “यावरून तो खूप लवकर पुढे जात असल्याचे दिसत आहे आणि तो भारतीय संघात येऊ शकतो.” अर्शदीपने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाबसाठी 31 सामने खेळले आहेत आणि 26.58 च्या सरासरीने 33 बळी घेतले आहेत. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा यांनी देखील आयपीएलमधील इतर प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच महान ब्रायन लाराने मलिकची तुलना वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सशी केली.
लारा म्हणाले होते की, “उमरान मलिक मला फिडेल एडवर्ड्सची आठवण करून देतो. सुरुवात केल्यावर तो खूप वेगवान गोलंदाजी करायचा. मला वाटते की त्याला (मलिक) माहित आहे की यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवू शकतो. तो नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळेल. आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजी खेळण्याची फलंदाजांना सवय झाली आहे, त्यामुळे मला आशा आहे की तो नंतर गोलंदाजी सुधारेल. तो नेटमध्ये झपाट्याने शिकतो. त्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत ज्या चांगल्या आहेत.” काश्मिरच्या उजव्या हाताने वेगवान गोलंदाजाने SRH साठी या हंगामात खेळलेल्या सर्व 7 सामन्यात त्याच्या वेगाने प्रभावित केले आहे. त्याने केवळ 10 विकेट्स घेतल्या नाहीत तर सात वेळा 'सर्वात जलद चेंडू'चा पुरस्कार पटकावला आहे. मलिकने ताशी 150 किमी वेगाने चेंडू टाकून सर्व फलंदाजांना अडचणीत आणले आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक दरम्यान तो टीम इंडियाशी नेटबॉलर होता. या हंगामात त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तो भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.