IPL 2022, MI vs DC: आयपीएलच्या (IPL) इतिहासात मुंबई इंडियन्स (MumbaI Indians) संघासाठी पहिले पाढे पंचावन्नच म्हणायची वेळ आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma9 याच्या नेतृत्वात मुंबईने सलग 10 वा सलामीचा सामना गमावला आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईविरुद्ध हंगामातील आपला पहिला सामना खेळताना दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 4 विकेटने सामना जिंकला. दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) आणि फलंदाजी ललित यादव (Lalit Yadav) यांनी आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईच्या तोंडून विजयाचा घास काढून घेतला. ललितने सर्वाधिक नाबाद 48 धावा ठोकल्या तर पटेलने 38 धावांचे नाबाद योगदान दिले. दिल्लीसाठी पृथ्वी शॉ याने सुरुवातीला 38 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबई अखेर नऊ वर्षानंतर आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवेल असे दिसत होते, पण ललित अंडी अक्षरने आपल्या संयमी खेळीने सामन्याचे चित्र पालटले. मुंबईसाठी बेसिल थंपीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच अश्विन दोन तर टायटल मिल्स याला एक विकेट मिळाली. (IPL 2022, MI vs DC Match 2: कुलदीप यादव याच्या फिरकीची कमाल, Tim Seifert याने जबरा कॅच घेऊन पोलार्ड ‘तात्या’ला दाखवली पॅव्हिलियनची वाट, पहा Video)
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्या जबरदस्त फलंदाजीने दिल्लीला सुरुवातीला विकेटसाठी भरपूर संघर्ष करायला भाग पाडले. तथापि नंतर कुलदीप यादव याने नियमित अंतराने विकेट घेत दिल्लीला सामन्यात कमबॅक करून दिले. कुलदीपला खालीलने योग्य साथ देत मुंबईला 177 धावांवर रोखलं. अशाप्रकारे दिल्लीला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले. मुंबईकडून किशनने 81 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने 41 धावांचे छोटेखानी योगदान दिले.
WHAT. A. CHASE. 🔥🔥@DelhiCapitals register their first victory of the season in style!
Scorecard - https://t.co/WRXqoHz83y #TATAIPL #DCvMI pic.twitter.com/prGmdPTAaN
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2022
प्रत्युत्तरात शॉ सोबत टिम सेफर्ट याने जोरदार सुरुवात केली, पण मुरुगन अश्विन याला पॉवर-प्लेच्या आपल्या एका षटकांत दोन विकेट घेऊन मुंबईला सुरुवातीलाच वर्चस्व मिळवून दिले. अश्विन पाठोपाठ मिल्सने पुढील षटकांत दिल्लीला मोठा झटका देत ऋषभ पंत याला फक्त एका धावेवर बाद केले. एका टोकावरून विकेट पडत असताना पृथ्वी शॉ ने डाव हाताळण्याचा प्रयत्न केला, तथापि चुकीचा फटका खेळून तो माघारी परतला. पृथ्वी देखील बाद झाल्यावर दिल्लीच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या, पण ललित आणि अक्षर यांनी सामन्याचे चित्रच बदलून टाकले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केला.