विराट कोहली आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) रविवारी सांगितले की, आयपीएल (IPL) 2021 मध्ये रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) चांगली कामगिरी करत पाहून मला खूप आनंद झाला आहे. विराट म्हणाला की, भारताच्या (Team India) प्रमुख अष्टपैलू खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणे नेहमीच चांगले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) जडेजाच्या अष्टपैलू खेळीने चेन्नईच्या 69 धावांच्या विजयानंतर कोहलीने प्रतिक्रिया दिली. रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्जच्या मुंबईतील हंगामाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली. जडेजाने 28 चेंडूत नाबाद 62 धावा फटकावल्या आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागड्या ओव्हरमध्ये 5 षटकार खेचले. हर्षल पटेलच्या अंतिम षटकात जडेजाने 37 धावा काढल्या. (CSK vs RCB IPL 2021 Match 19: जडेजाचा ‘वन मॅन शो’, बेंगलोरवर 69 धावांनी मात करत अखेर ‘धोनीब्रिगेड’ने रोखला ‘विराटसेने’चा विजयरथ)

विराट कोहलीने खेळाडूवृत्ती दाखवत पराभव स्वीकारला आणि असे सांगितले की, रवींद्र जडेजाला अव्वल फॉर्ममध्ये असणे टीम इंडियासाठी चांगले आहे. उल्लेखनीय म्हणजे, जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात हाताला दुखापत झाल्यानंतर जडेजाला भारतातील इंग्लंडविरुद्ध द्विपक्षीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. “भूतकाळात मी बर्‍याच गोष्टींवर विश्वास ठेवला होता. प्रत्येकाने त्याची क्षमता पाहण्यासारखी आहे,” आरसीबीच्या सीएसके विरोधात पराभवानंतर कोहली म्हणाला. “ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दुखापतीनंतर तो संघातून (भारत) बाहेर आहे. त्याने बॅट, बॉल आणि मैदानावर कामगिरी करताना मला खूप आनंद झाला. आपला प्रीमियर अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करुन चांगल्या जागी असो अशी तुमची इच्छा असते. मला आशा आहे की तो हे बर्‍याचदा करत राहो कारण जेव्हा त्याला आत्मविश्वास येतो आणि तो चांगली कामगिरी करतो तेव्हा केवळ चेन्नईच नव्हे तर भारतीय क्रिकेटलाही बर्‍याच संधी मिळतात,” विराट पुढे म्हणाला.

दरम्यान, जडेजाच्या नाबाद अर्धशतकी खेळीने चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 191/4 अशा धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. बॅटनंतर जडेजा चेंडूने देखील चमक दाखवली आणि आपल्या चार ओव्हरमध्ये 4/13 अशी आकडेवारी नोंदवली. शिवाय त्याने डॅन ख्रिश्चनला धावबाद देखील केले. 191 धावांचा पाठलाग करताना आरसीबी 122/9 धावाच केल्या आणि अखेर तीन वेळा आयपीएल चॅम्पियन्सने वानखेडेवर स्टाईलमध्ये विजय मिळवला.