
भारतामध्ये घोंघवणारं कोरोना वायरसच्या दुसर्या लाटेचं संकट आता आयपीएल (IPL) वर देखील पडलं आहे. आज चैन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये बुधवार 5 मे दिवशी होणारा सामना लांबणीवर पडल्याची माहिती देण्यात आली आहे. बॉलिंग कोच एल बालाजी (Lakshmipathy Balaji) याचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. बीसीसीआय च्या SOP नुसार जर एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखील किमान 6 दिवस आयसोलेशन मध्ये ठेवलं जातं. तर या काळात त्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट देखील केल्या जातात. त्यादेखील 3 टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना यामधून बाहेर पडता येईल.
भारतीय क्रिकेट बोर्ड च्या एका अधिकार्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये अरूण जेटली स्टेडियल वर उद्या होणारी मॅच एसओपी नियमांच्या अंतर्गत आता लांबणीवर पडला आहे. बालाजी सार्यांच खेळाडूंच्या संपर्कामध्ये आले होते. त्यामुळे सार्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जाईल. त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या आरोग्याच्या नोंदणीवर लक्ष ठेवले जाईल. तर सीएसके चे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी संपर्क केल्यानंतर सीएसकेने बालाजीच्या आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्टची माहिती बीसीसीआयला देण्यात आल्याचं सांगितलं आहे.
यंदाच्या आयपीएलच्या सीझन मध्ये हा दुसरा सामना आहे जो कोविड 19 च्या सावटामुळे लांबणीवर पडला आहे. काल कोलकाता नाईट रायडर्स च्या 2 खेळाडूंचा म्हणजे वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे कोविड 19 पॉझिटीव्ह आल्याचं समजल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्धचा त्यांचा सामना देखील रिशेड्युल करण्यात आला होता. नक्की वाचा: IPL 2021: कोरोनामुळे BCCI कडून आयपीएल संबंधित बदल करण्याचा विचार, 'या' शहरात खेळवले जाऊ शकतात सामने.
दिल्लीमध्ये आज मुंबई इंडियंस आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा सामना वेळापत्रकानुसार आयोजित आहे. पण सध्या मुंबई इंडियन्सचे देखील टेन्शन वाढलं आह. कारण शनिवारी ते सीएसके विरूद्ध सामना खेळले होते. मॅच दरम्यान बालाजी त्यांच्यादेखील अनेक खेळाडूंच्या संपर्कात आला होता.