IPL 2021: कोरोनामुळे BCCI कडून आयपीएल संबंधित बदल करण्याचा विचार, 'या' शहरात खेळवले जाऊ शकतात सामने
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीजनवर कोरोनाचे सावट आल्याच्या कारणास्तव एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड टूर्नामेंटमध्ये होणारे सर्व पुढील सामने मुंबईत खेळवण्याचा विचार करत आहे. भारतात अन्य सर्व ठिकाणी आयसोलेशन ठिकाणे सोडून 7 मे पर्यंत सर्व टीम्स मुंबईत दाखल होऊ शकतात. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडिअम मध्ये सर्व टीमची व्यवस्था केली जाऊ शकते.(IPL 2021: चेन्नई सुपर किंग्जच्या 'या' 3 सदस्यांना कोरोनाची लागण? महत्वाची माहिती आली समोर)

मीडियात आलेल्या माहितीनुसार, 7 मे पर्यंत सर्व टीम मुंबईत एकत्रित येणार असल्याची तारीख ठरवण्यात आली आहे. जर बोर्ड आणि फ्रेंचाइजी टीम असे वाटले की हॉटेल्स आणि अन्य ठिकाणे सॅनिटाइज करण्यास हा वेळ पुरेसा नाही तर निर्णयासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. दरम्यान, सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये खेळवण्यात आलेला सामना रद्द करण्यात आला.

कोलकाताचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बीसीसीआयने टूर्नामेंटच्या भविष्यासंदर्भात चर्चा केली आहे. सध्या कोलकाताच्या संपर्कात आलेला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. असे सांगितले जात आहे की, बोर्डाकडून चार्टर प्लेन, हॉटेल आणि स्टेडिअ सॅनिटाइज करण्यामध्ये व्यस्त आहे. लवकरच सर्व 8 टीमच्या राहण्याची व्यवस्था मुंबईत सुनिश्चित केली जाईल.

सध्या आयपीएलचे सामने दिल्ली, बैंगलोर, अहमदाबाद, मुंबई, चैन्नई आणि कोलकाता येथे होत आहेत. अशातच आता सर्व सामने मुंबईत खेळवण्याचा विचार केला जात आहे. मुंबईतील तीन स्टेडिअममध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात. सध्या मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर सुद्धा काही सामने खेळवले जात आहेत.