IPL 2021 Qualifier 2: दिल्ली की कोलकाता, फायनलमध्ये कोणता संघ सुपर किंग्सशी भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या खेळीने लागणार दुसऱ्या क्वालिफायरचा निकाल
नितीश राणा (Photo Credit: PTI)

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे स्वप्न भंग करत इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) चार विकेटने दणदणीत विकेट मिळवला. आता फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध खेळण्यासाठी केकेआर (KKR) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) भिडेल. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) हा निर्णायक सामना रंगणार असून विजेता संघ सीएसकेला फायनल खेळेल. तर पराभूत झालेल्या संघाचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंग होईल. मॉर्गनच्या नेतृत्वातील नाईट रायडर्स सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत तर दिल्लीला गेल्या काही सामन्यात फलंदाजीने संघर्ष करावा लागला आहे. अशा स्थितीत उद्या होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंची कामगिरी या सामन्याचा निकाल लावेल. (IPL 2021: RCB मधून ‘कर्णधार’ विराट कोहलीचा ‘पॅकअप’, KKR विरुद्ध पराभवासह आयपीएल कॅप्टन्सीवर लागला ब्रेक)

सुनील नारायण (Sunil Narine)

केकेआरचा स्टार फिरकीपटूने बेंगलोरविरुद्ध अष्टपैलू खेळी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने पहिले विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्ससह एकूण चार मोठ्या विकेट घेत आरसीबीचं कंबरडं मोडलं. त्यानंतर बॅटने देखील त्याने सुरुवातीपासून आपली भूमिका स्पष्ट करत आसीबी गोलंदाजांवर हल्ला चढवला. अशा स्थितीत आता दिल्लीविरुद्ध आणखी एका निर्णायक सामन्यात अनुभवी नारायणच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. संघाला त्याच्याकडून बेंगलोरविरुद्ध खेळलेल्या खेळीची पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.

व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)

2021 च्या आयपीएल लिलावात कोलकात्याने त्याच्यावर दाव लावला होता. आणि आयपीएलच्या युएई आवृत्तीत फ्रँचायझीने दाखवलेला विश्वास सार्थक ठरवला. युएई येथे केकेआरच्या यशाचे महत्वपूर्ण कारणांपैकी एक अय्यरने सलामीला येत त्याने एकूण 265 धावा केल्या. या दरम्यान त्याने दोनदा अर्धशतकी पल्ला देखील गाठला. आता दिल्लीविरुद्ध दुसया क्वालिफायरमधेही त्याच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा असेल.

शिखर धवन (Shikhar Dhawan)

दिल्लीचा अनुभवी सलामी फलंदाजाने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण खेळी केली आहे. आयपीएलमध्ये सलग दोनदा त्याने ऑरेंज कॅपच्या पहिल्या पाच यादीत स्थान मिळवले आहे. पण सध्या धवन चांगल्या लयीत दिसत नाही. दिल्लीला शारजाह येथे मोठी धावसंख्या करायची असल्यास धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात मोठी भागीदारी होणे गरजेचे आहे. तसेच धावांचा पाठलाग करतानाही धवनवर मोठी जबाबदारी असेल.

एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje)

नॉर्टजेचा कच्चा वेग शॉट्सवर खेळणे कदाचित सोपे नसेल. नॉर्टजेकडे एक शॉर्ट बॉल देखील आहे जो फलंदाजाला नियंत्रित करणे कठीण होईल आणि म्हणूनच, नॉर्टजे केकेआर विरोधात एक धोकादायक गोलंदाज ठरू शकतो. नॉर्टजे सुरुवातीला आणि डेथ ओव्हर्समध्ये सामन्याचा खेळ सक्षम आहे. त्यामुळे नॉर्टजे दिल्लीसाठी महत्वपूर्ण ठरू शकतो.