IPL 2021: RCB मधून ‘कर्णधार’ विराट कोहलीचा ‘पॅकअप’, KKR विरुद्ध पराभवासह आयपीएल कॅप्टन्सीवर लागला ब्रेक
विराट कोहली व इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

इंडियन प्रिमीयर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या पर्वाच्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला विकेटने जोरदार पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आरसीबीने (RCB) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात केकेआरने (KKR) विकेट गमावून 19.4 ओव्हरमध्ये लक्ष्य साध्य केले. यासह आयपीएल कर्णधार (IPL Captaincy) म्हणून त्याला शेवटच्या सामन्यात इयन मॉर्गनच्या केकेआरच्या हातून पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2021 च्या हंगामात विराट कोहलीला आरसीबी फ्रँचायझीसाठी जेतेपद जिंकता आले नाही आणि केकेआरच्या पराभवामुळे या लीगमध्ये त्याच्या कर्णधारपदाचा प्रवास जेतेपदाच्या दुष्काळासह संपुष्टात आला आहे. विराट कोहलीने युएई आवृत्तीच्या सुरुवातीपूर्वीच या हंगामानंतर तो आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचे आणि पुढील हंगामात एक खेळाडू म्हणून खेळणार असल्याचे घोषित केले होते. विराट कोहलीने फलंदाज म्हणून आरसीबीसाठी जबरदस्त कामगिरी केली आहे, पण कर्णधार म्हणून त्याला संघासाठी एकही विजेतेपद मिळवता आले नाही. कर्णधार म्हणून त्याच्या शेवटच्या मोसमातही तो कारनामा करू शकला नाही. (IPL 2021, RCB vs KKR Eliminator: आयपीएलमधून विराट‘आर्मी’चा पॅकअप, Sunil Narine च्या ताबडतोड फलंदाजीने कोलकाताची आरसीबीवर 4 विकेटने मात)

डॅनियल व्हिटोरीनंतर 2011 मध्ये कोहलीला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यानंतर, त्याने 11 हंगामात संघाचे नेतृत्व केले, परंतु संघ चॅम्पियन बनू शकला नाही आणि विराट कोहलीला याची कमतरता नक्कीच जाणवत राहिलं. विराटच्या नेतृत्वात RCB ने 2016 मध्ये संघाने सर्वोत्तम खेळ केला जेव्हा संघ उपविजेता बनला आणि त्या हंगामात विराट कोहलीने 4 शतकांसह एकूण 900 पेक्षा जास्त धावा केल्या. आयपीएल इतिहासातील हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणताही फलंदाज मोडण्यातच नाही त्याच्या जवळही पोहोचण्यास अपयशी ठरला आहे. कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने या लीगमध्ये एकूण 140 सामने खेळले आहेत, ज्यात संघाने 64 सामने जिंकले आहेत आणि 69 सामने गमावले आहेत. एक कर्णधार म्हणून तो आतापर्यंत या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार होता आणि सर्वाधिक सामने जिंकण्यातही यशस्वी झाला.

याशिवाय त्याने 140 सामन्यांमध्ये या संघाचे नेतृत्व केले आणि आतापर्यंत एका फ्रँचायझीसाठी सर्वाधिक सामन्यात संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा कर्णधार बनला आहे. त्याच्या पुढे या एलिट यादीत एमएस धोनी आहे. विराट कोहली आरसीबीसह या लीगच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत फलंदाज म्हणून 207 सामन्यांमध्ये 6283 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एकूण 5 शतके आणि 42 अर्धशतकी खेळी केली आहे. दुसरीकडे, RCB साठी कर्णधार म्हणून त्याच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने 33 चेंडूंत 5 चौकारांसह 39 धावा केल्या आणि सुनील नारायणच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होत डाव संपुष्टात आला.