IPL 2021: ‘या’ 5 आयपीएल स्टार खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये केली कमाल, आता टी-20 लीगमध्ये करणार धमाल
देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगने (Indian Premier League) स्थापनेपासूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) प्रतिभा शोधण्याचे करण्याचे काम केले आहे. अवांतर टी -20 लीगने रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या असे अनेक मोठे खेळाडू भारतीय संघाला (Indian Team) दिले आहे. आयपीएलने (IPL) खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी दिली आहे जेणेकरून त्यांना स्थानिक क्रिकेटमधून वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवणे सुकर झाले आहे. या प्रदर्शनामुळे त्यांना उच्च स्तरावर कामगिरी करण्यास मदत झाली आहे. सध्या भारतात इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका सुरु असताना बाजूला घरगुती स्तरावर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा देखील खेळवली जात आहे. यामध्ये अनेक आयपीएल सुपरस्टार्सने कहर केला आहे. आजच्या या लेखात आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (IPL 2021 Schedule: आयपीएल रणसंग्राम एप्रिलपासून रंगणार, BCCI कडून सामन्यांच्या तारखा जाहीर)

1. पृथ्वी शॉ 

सध्या सुरू असलेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉने सात सामन्यांतून 754 धावा केल्या आहेत परिणामी त्याने मयंक अग्रवालचा विक्रम मोडला ज्याने 2017-18 च्या विजय हजारे ट्रॉफीच्या आवृत्तीत 723 धावा केल्या होत्या.सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. युवा मुंबईकर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने सात गेममध्ये अनुक्रमे 188.50 आणि 134.88 च्या सरासरी आणि स्ट्राइक रेटने चार शतके झळकावली आहेत. शिवाय, त्याने पुडुचेरीविरुद्ध 227 धावांच्या खेळीसह सर्वोच्च वैयक्तिक धावांच्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले.

2. देवदत्त पडिक्क्ल 

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पडिक्क्लने विजय हजारे स्पर्धेत 737 धावांसह दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. कर्नाटकी फलंदाजाने चार शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. त्याने यंदा स्पर्धेत 152 धावांची वैयक्तिक खेळी केली.

3. नितीश राणा

नितीश राणाचा सध्याचा फॉर्म पाहून केकेआर व्यवस्थापन खूप आनंदी होईल. दिल्ली फलंदाजाने सात सामन्यांत 398 धावाांसह स्पर्धेत पाचव्या सर्वाधिक धावा केल्या आहे. त्याने 97.78 च्या स्ट्राइक रेटने 398 धावा केल्या आहेत. यादरम्यान, राणाने दोन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. त्याचे फॉर्ममध्ये परतणे केकेआरचे सोपे होईल, ज्यांना आघाडीच्या फळीत घातक फलंदाजासाठी संघर्ष करावा लागला आहे.

4. कृणाल पांड्या

बडोद्याचे प्रतिनिधित्व करीत पाच सामन्यांत 29 वर्षीय कृणालने 129.33 च्या सरासरी आणि 117.93 च्या स्ट्राइक रेटने 388 धावा केल्या आहेत.

5. रॉबिन उथप्पा

वय ही एक संख्या आहे, इतिहासात बर्‍याच वेळा हा वाक्प्रचार वापरला गेला आहे, तर रॉबिन उथप्पाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यंदा ते योग्य सिद्ध करून दाखवले आहे. सहा सामन्यांमध्ये आताच्या सीएसके फलंदाजाने 75.40 च्या सरासरी आणि 131.81 च्या स्ट्राइक रेटने 377 धावा केल्या आहेत. एमएस धोनी आणि सीएसके संघ व्यवस्थान प्लेइंग इलेव्हन निवड करताना त्याचा सध्याचा फॉर्म नक्कीच विचारात घेईल.