IPL 2021, KKR vs RR: शारजाह येथे संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात मोठ्या लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केकेआरने (KKR) दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थान अवघ्या 85 धावांवर ढेर झाला. परिणामी संघाला 86 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला आहे. रॉयल्सच्या पराभवामुळे त्यांचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंग झाले तर कोलकाताने अंतिम चार संघात आपला प्रवेश निश्चित केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विजयात शुभमन गिल आणि गोलंदाजांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. केकेआरकडून शिवम मावीने (Shivam Mavi) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच लॉकी फर्ग्युसनला 3, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसरीकडे, राजस्थानसाठी अष्टपैलू राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सर्वाधिक 44 धावा केल्या. तर शिवम दुबेने 18 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉयल्सचा अन्य कोणताही फलंदाजी दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. (IPL 2021, CSK vs PBKS: कर्णधार KL Rahul च्या तुफानी अर्धशतकाने पंजाबचा दणकेबाज विजय, चेन्नईवर 6 विकेटने केली मात)
शारजाह येथे केकेआरने यंदाच्या मोसमाची सर्वात मोठी 171 धावसंख्या उभारली. प्रत्त्युत्तरात राजस्थानचा एकही फलंदाज तग धरून खेळू शकला नाही. राजस्थानच्या फलंदाजीला सुरुवात होताच त्यांचे गडी बाद होण्यास सुरुवात झाली. पहिले शाकिबने यशस्वीला शून्यावर बाद केले. त्यानंतर मावीने कर्णधार सॅमसनला माघारी धाडले. लियाम लिविंगस्टोन आणि अनुज रावत यांची विकेट घेत फर्ग्यूसनने राजस्थानला दोन झटके दिले. त्यानंतर मावीने एकाच षटकात ग्लेन फिलिप्स आणि शिवम दुबे असे राजस्थानचे दोन गडी तंबूत धाडले. आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला क्रिस मॉरिसच्या अपयशाचे सत्र यंदाही सुरूच राहिले. सध्या दुखापतीने त्रस्त असलेल्या वरुण चक्रवर्तीने त्याची विकेट घेतली. यादरम्यान तेवतिया एकटा लढा देत राहिला पण दुसऱ्या टोकाला योग्य साथ न मिळाल्यान त्याची झुंज अपयशी ठरली.
यापूर्वी टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या केकेआरसाठी सलामीवीर शुभमन गिलने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने 38 आणि राहुल त्रिपाठीने 21 धावांचे योगदान दिले. रॉयल्ससाठी क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, ग्लेन फिलिप्स आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.