IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या सत्रात एक मोठा विक्रम मोडला जाऊ शकतो. आयपीएल (IPL) सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा रेकॉर्ड आहे. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) हा विक्रम मोडल्याचा दावा केला आहे. या हंगामात आयपीएलमधील एका सामन्यात त्याने सर्वाधिक षटकार लगावावेत अशी जोस बटलरची इच्छा आहे, जे अद्याप कोणत्याही फलंदाजाला करता आलेले नाही. इंग्लिश फलंदाज जोस बटलरने ESPNCricinfo शी बोलताना एका प्रश्नाचं उत्तर देताना यंदाच्या मोसमात एका डावात सर्वाधिक षटकार (Most Sixes in Innings) मारण्याचा विक्रम तोडण्यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं. क्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (Royal Challengers Bangalore) पुणे वॉरियर्स (Pune Warriors) इंडियाविरुद्ध डावात 17 षटकार ठोकले होते. अशा परिस्थितीत बटलरला यंदाच्या हंगामात कॅरेबियन ज्येष्ठ फलंदाजाचा विक्रम आपल्या नावावर करायचा आहे. (IPL 2021: या टी-20 सुपरस्टारने अवघ्या 37 चेंडूत आयपीएलमध्ये ठोकले शतक, पहा सर्वात वेगवान शतक करणारे 3 भारतीय फलंदाज)
राजस्थान रॉयल्स सोमवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाविरुद्ध आयपीएल 2021 चा पहिला सामना खेळण्यास सज्ज होत आहे. मात्र, जोस बटलरला गेलचा रेकॉर्ड मोडसाठी बॅटने महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. इंग्लंड संघाच्या या धाकडे फलंदाजाची सामर्थ्यात शक्ती किंवा षटकार ठोकण्याच्या क्षमतेबद्दल कोणालाही शंका नाही. 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 73 चेंडूत 89 धावांच्या खेळीत बटलरने आपल्या डावात 7 षटकार खेचले होते. रॉयल्स संघाकडून यंदाच्या हंगामात बटलर आणि बेन स्टोक्सची जोडी सलामीला मैदानात येताना दिसण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्स यंदाच्या मोसमात वानखेडे, इडन गार्डन आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर मिळून 10 सामने खेळणार असल्याने इंग्लिश फलंदाजाला या विक्रमाची पूर्तता करण्याची पुरेपूर संधी मिळेल.
Can @josbuttler break the record for most sixes in an IPL game?
Watch him on #IPL10s ⤵️ pic.twitter.com/EfFWOPEbZR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 11, 2021
आयपीएलमध्ये संजू सॅमसन पहिल्यांदा रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. मागील वर्षी रॉयल्सला पॉइंट्सटेबलच्या तळाशी समाधान मानावे लागले होते त्यामुळे 13वा हंगाम संपल्यानंतर केरळच्या फलंदाजाला स्टीव्ह स्मिथच्या जागी कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे अष्टपैलू आणि फिरकीचे चांगले पर्याय आहेत; त्यांचे सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे सॅमसन आणि व्यवस्थापनापुढे एक मोठे आव्हान असेल.