केएल राहुल, मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

Fastest Century in IPL History: आयपीएलसारख्या (IPL) स्पर्धेत काही फलंदाज फार कमी वेळात खेळ पूर्णपणे बदलू शकतात आणि विरोधी संघाच्या गोलंदाजानावर हल्ला बोल करू शकतात. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) भारतात पुनरागमन झाले आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरसच्या जगभरातील प्रसारामुळे आयपीएल युएई येथे हलवण्यात आले होते मात्र आता पुन्हा एका स्पर्धेचे भारतात आयोजन होणार आहे. क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध स्पर्धेची प्रतिक्षा खेळाडू आणि चाहते मोठ्या उत्सुकतेने करत आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये तसे शतक ठोकणे फलंदाजाला कठीणच असते म्हणूनच आयपीएलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोजक्या खेळाडूंचं खेळाच्या या फॉरमॅटमध्ये शंभरी धावसंख्या पार करता आली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत सचिन तेंडुलकर, क्रिस गेल, ब्रेंडन मॅक्युलम यांच्यासारख्या फलंदाजांनी शतके ठोकली आहेत. आज आपण भारतीय फलंदाजांनी आयपीएलमध्ये ठोकलेल्या तीन वेगवान शतकांबद्दल जाणून घेणार आहोत. (IPL 2021: ‘हे’ 5 धुरंधर फलंदाज यंदा आयपीएलमध्ये मोडू शकतात क्रिस गेलच्या Fastest Century चा रेकॉर्ड)

1. युसूफ पठाण

आयपीएल इतिहासात आजवर भारतीय फलंदाजाने केलेल्या वेगवान शतकाचा रेकॉर्ड थोरल्या पठाण बंधूच्या नावावर आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना युसूफने आयपीएल 2010 मध्ये अवघ्या 37 चेंडूत हा कारनामा केला होता. मुंबईने राजस्थानपुढे 213 धावांचा डोगर उभारला होता. युसूफने शतकी खेळी करून संघाला विजयाच्या जवळ नेले मात्र त्यांना अवघ्या 4 धावा कमी पडल्या.

2. मयंक अग्रवाल

किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) संघासाठी खेळताना मयंक मागील वर्षी या यादीत सामील झाला. टीम इंडियाच्या या सलामी फलंदाजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडला आणि 45 चेंडूत तिहेरी धावसंख्या गाठली. मयंकने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 7 षटकार खेचले व 106 धावा केल्या.

3. मुरली विजय

2010 आयपीएलच्या आपल्या पहिल्या मोसमात भारतीय कसोटी सलामीवीर मुरली विजयने 9वे वेगवान शतक ठोकले. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात विजयने शंभरी धावसंख्या पार केली होती. विजयच्या 56 चेंडूत 127 धावांच्या जोरावर चेन्नईने 246/5 अशा धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्याने अ‍ॅल्बी मॉर्केलसह 66 चेंडूंमध्ये 152 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या आजवरच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत 2013 मध्ये अवघ्या 30 चेंडूत सेंच्युरी ठोकली होती. विशेष म्हणजे गेलचा स्पर्धेतील हा रेकॉर्ड आजवर अबाधित आहे.