IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) हंगाम आता जवळ आला आहे. क्रिकेट चाहते देखील आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल (IPL) 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून पहिला सामना गेतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चेन्नई येथे खेळला जाणार आहे. आयपीएलला चौकार आणि षटकारांचा खेळ म्हणतात. या लीगमध्ये खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत असे धगधगते डाव खेळला जे ऐतिहासिक ठरले आहे. आयपीएलमध्येही काही खेळाडूंनी अनेक मोठे डाव खेळले आहेत. त्यातील एक आयपीएलमध्ये बनलेले वेगवान शतक आहे. हा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज क्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे, ज्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून अवघ्या 30 चेंडूत शतक पूर्ण केले होते. गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध (Rising Pune Supergiant) शतक ठोकले होते. त्याने 175 धावांची शानदार खेळी केली होती जी आजवर अन्य फलंदाजाला करता आली नाही. (IPL 2021: ‘हे’ 5 खेळाडू आहे आयपीएलच्या Orange Cap चे प्रमुख दावेदार, यादीत भारतीयांचा दबदबा)
आयपीएलमध्ये असे काही खेळाडू आहेत जे गेलचा हा विक्रम मोडू शकतात. आयपीएल 2021 मध्ये 5 धुरंधर फलंदाज सर्वात जलद शतक ठोकण्याचा गेलचा विक्रम मोडू शकतात.
1. जोस बटलर
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा स्फोटक फलंदाज जोस बटलरने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये 150 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. बटलरने आतापर्यंत आयपीएलचे फक्त 4 हंगाम खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने 45 सामन्यामध्ये 150.81 च्या स्ट्राइक रेटने 1386 धावा केल्या आहेत.
2. केएल राहुल
राहुलने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. राहुल खूप वेगवान खेळतो. आयपीएल कारकीर्दीत त्याने 67 सामन्यांत 138 पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने 1977 धावा केल्या आहेत आणि तो त्याच्याच संघाचा सहकारी गेलच्या वेगवान शतकाचा विक्रम मोडू शकतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
3. सुरेश रैना
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना यलो आर्मीसाठी वर्षभराच्या अंतरानंतर आयपीएल 2021 मध्ये जोरदार कमबॅक करू इच्छित आहे. आयपीएलमधील वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. रैना कुठल्याही गोलंदाजाचा सामना करु शकतो आणि ‘युनिव्हर्स बॉस’ने आपल्या नावावर केलेला सात वर्षांचा रेकॉर्ड मोडू शकतो.
4. जॉनी बेअरस्टो
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने भारताविरुद्ध पहिल्या आणि दुसर्या वनडे सामन्यात अनुक्रमे 94 व 122 धावा केल्या आहेत. त्याच्या 21 आयपीएलमध्ये बेअरस्टोने 790 धावा केल्या आहेत.
5. रोहित शर्मा
आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा एकमेव खेळाडू रोहित शर्माची चमकदार आयपीएल कारकीर्द आहे. रोहित शर्माने आयपीएल कारकीर्दीतील 200 सामन्यात 130.61 च्या स्ट्राईक रेटने एकूण 5230 धावा केल्या असून सर्वाधिक धावा असलेल्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. अशास्थितीत रोहितने गेलचा रेकॉर्ड मोडला तर चकित होण्याची गरज नाही.
अखेरीस, विंडीजच्या गेलने स्वतः आपलाच रेकॉर्ड मोडला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रत्येक मोसमात अनेक फलंदाजीचे विक्रम नोंदवले जातात. एका ओव्हरमध्ये सहा षटकारांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत.