IPL 2021: ‘हे’ 5 खेळाडू आहे आयपीएलच्या Orange Cap चे प्रमुख दावेदार, यादीत भारतीयांचा दबदबा
सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2021 Orange Cap Contenders: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा हंगाम सुरू होणार असल्याने प्रत्येक फलंदाज स्वत: चे सामर्थ्य दाखवण्यासाठी कसून तयारी करत आहे. आयपीएलचा (IPL) 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार असून 8 संघांदरम्यान 60 सामने खेळवले जाणार आहेत. गतविजेत्या रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चेन्नई येथे विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाविरुद्ध सामन्याने मोसमाची सुरुवात करतील. मागील वर्षी कोविड-19 च्या उद्रेकामुळे युएईमध्ये झालेल्या मोहिमेनंतर आयपीएल भारतात परतले आहे ज्याचा फलंदाजांना सर्वाधिक फायदा होईल आणि ते आपापल्या संघासाठी चमकदार कामगिरी करू शकतील. आयपीएल 14 च्या मोसमातील सलामीच्या सामन्यापूर्वी, यंदाच्या स्पर्धेत पाच खेळाडूंवर नजर टाकू जे ऑरेंज कॅप मिळवण्याचे मुख्य दावेदार असू शकतात विशेष म्हणजे या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसत आहे. (IPL 2021: आयपीएलच्या 14व्या हंगामात ‘या’ विक्रमांवर विराट कोहलीची नजर, पाहा रनमशीन कोणते रेकॉर्ड करू शकतो)

1. केएल राहुल

2020 मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला पंजाब किंग्जचा कर्णधार राहुल पुन्हा एकदा हा पुरस्कार जिंकण्याच्या मुख्य दावेदारांपैकी एक असेल. राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी अधिक चांगलीपणे हाताळत 5 अर्धशतक आणि एका शतकासह 129.34 च्या सरासरीने 670 धावा केल्या. इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आपला फॉर्म पुन्हा मिळवल्यानंतर राहुल इतर स्पर्धकांना ऑरेंज कॅपसाठी नक्कीच स्पर्धा देईल.

2. विराट कोहली

अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या फॉर्मविषयी बरीच चर्चा झाली आहे. इंग्लंडविरुद्ध मर्यादित ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे भारत आणि आरसीबी कर्णधार अद्याप ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल दावेदार म्हणून सुरुवात करेल.त्याला नेहमीच पुढाकाराने नेतृत्व करायला आवडते आणि सलामीवीर म्हणून सुरुवात करणार असल्याने कोहली मोठा दावेदार ठरू शकतो. यापूर्वी कोहलीने ओपनर म्हणून 2016 मध्ये विक्रमी 973 धावा ठोकल्या होत्या.

3. रिषभ पंत

आयपीएल 2020 हंगाम दिल्ली कॅपिटल्स कॅप्टनसाठी फलंदाज म्हणून यशस्वी ठरला नाही. 113.95 च्या भन्नाट स्ट्राईक रेटने 341 धावा करणारा पंत यंदा नवीन सुरुवात करू इच्छित असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याचा भव्य फॉर्म निश्चितच त्याला ऑरेंज कॅपचा आशादायक दावेदार बनते.

4. डेविड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एक धोकादायक वनडे आणि टी -20 फलंदाज मानला जातो. तसेच, जेव्हा ते रंगात येतात तेव्हा गोलंदाज पाणी भरतो, वॉर्नरनेही त्याच्या नेतृत्वात हैदराबादला जेतेपद जिंकून दिले आहेत. 2015, 2016 आणि 2017 मध्ये सलामीवीर वॉर्नर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

5. निकोलस पूरन

वेस्ट इंडिजचा हा धाकड फलंदाज यंदा भारतात संपूर्ण आयपीएल सीझन खेळताना दिसणार असेल. 21 सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट 165.39 आहे आणि त्याला पंजाब फ्रँचायझी संघाच्या व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे. डेविड मलान सुद्धा त्यांच्या फलंदाजी क्रमात सामील झाल्यामुळे पूरनकडे वेगवान गोलंदाजांविरुद्ध हात मोकळा करून करून खेळण्याची आणि फलंदाजीची परिस्थिती वापर करून घेण्याची चांगली संधी असेल.

दरम्यान, जॉनी बेयरस्टो, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, ईशान किशन देखीलयंदा आयपीएलच्या ऑरेंज कॅपचे दावेदार ठरू शकतात. सूर्यकुमार, किशन आणि बेयरस्टो नुकत्याच संपुष्टात आलेल्या वनडे आणि टी-20 मालिकेत शानदार फॉर्ममध्ये होते. त्यामुळे या फलंदाजांच्या खेळावर देखील यंदा चाहत्यांचे लक्ष लागून असेल.