IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) जलवा पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये (IPL) विराटची बॅट सातत्याने धावा काढत आहे. तो एकाच संघासाठी सलग 13 आयपीएल हंगाम खेळणारा एकमेव खेळाडू आहे. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून विराट आरसीबीकडून (RCB) सातत्याने खेळत आहे. कोहली तीन वेळा आयपीएल फायनल गाठणाऱ्या आरसीबी संघाचा अविभाज्य भाग आहे. आयपीएल 2016 हे विराटसाठी करिश्माई वर्ष ठरले होते. त्याने चार आयपीएल शतकांसह 973 धावा ठोकल्या होत्या. विराट जेव्हा-जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा-तेव्हा विराटने अनेक विक्रम केले आहेत. आयपीएल 2021 मध्ये विराट कोहली कोणते नवीन विक्रम नोंदवू शकतो तेआज आपण जाणून घेऊया. (Most Runs in IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' 5 खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा; यादीत 4 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश)
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमधील 192 सामन्यांच्या 184 डावांमध्ये 5878 धावा केल्या आहेत. या दरम्यान विराटने 5 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत. शिवाय, यंदा तो संघासाठी सलामीला येणार असल्याचं आयपीएल सुरू होण्यापूर्वी विराटने जाहीर केले होते. विराट या आगामी आयपीएलमध्ये अनेक विक्रम करू शकतो. कोहलीला टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या 269 धावा दूर आहे. याशिवाय 200 आयपीएल सामान्यांपासून तो फक्त 8 सामने दूर आहे. आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 122 धावांची गरज आहे. विराट कोहली आयपीएलमधील 50 अर्धशतक पूर्ण करण्यापासून 6 अर्धशतक दूर आहे. मोहम्मद रिझवान 1011 धावा, मार्कस स्टोइनिस 904 धावा आणि बाबर आझम 843 नंतर 2020-2021 हंगामात टी-20 फॉर्मेटमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे. विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमवर कोहलीने 409 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 142.5 होता. आयपीएलमध्ये इतर स्थानांवर 34.0 सरासरी 125.2च्या स्ट्राईक रेटच्या तुलनेत सलामीवीर म्हणून कोहलीची सरासरी 46.9 असून स्ट्राइक रेट 140.2 आहे.
आयपीएल 2021 9 एप्रिलपासून सुरू होणार असून यंदा मोसमातील पहिला सामना चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांकडून जबरदस्त स्पर्धा होईल अशी चाहत्यांना अपेक्षित असेल.