IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामात पुन्हा एकदा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. गेल्या वर्षी युएईमधील (UAE) मुंबई इंडियन्सने पाचवे जेतेपद पटकावले होते आणि स्पर्धेतील आठही संघांपैकी एक सर्वोत्तम संघ बनला. आयपीएल (IPL) 2021 पूर्वी मिनी-लिलाव आयोजित केला जाणार आहे ज्यात मुंबई इंडियन्स, जे सर्व विभागांमध्ये सुसज्ज दिसत आहेत, अधिक बदल करू इच्छित नसतील. मात्र, आपला संघ अधिक बळकट करण्यासाठी लिलावात काही नवीन चेहऱ्यांना सामील करण्यासाठी, जुन्या खेळाडूंना ‘बाय बाय’ करण्याच्या विचारात असतील. लीग टप्प्याच्या शेवटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संपूर्ण हंगामात ज्येष्ठ वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची साथ नसतानाही मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 मध्ये आपले वर्चस्व राखले आणि आपले पाचवे विजेतेपद पटकावले. आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स काही मोठ्या खेळाडूंची साथ सोडू शकते ज्यांची नावं खालीलप्रमाणे आहे. (IPL 2021 Auction: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील हे 5 खेळाडू आयपीएल लिलावात आणणार रंगात, मिळू शकते कोटींचे मानधन)
1. क्रिस लिन (Chris Lynn)
कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केल्यावर ऑस्ट्रेलियन ओपनरला मुंबई इंडियन्सने मागील वर्षी लिलावात दोन कोटींच्या बेस किंमतीवर खरेदी केले होते. मात्र, आयपीएल 2020 मध्ये लिनला एकही सामना खेळण्यास मिळाली नाही आणि बेंचवरच बसून राहिला. 2021मधेही रोहितआणि क्विंटन डी कॉक सलामीसाठी टीमची पहिली पसंती असल्याने फ्रँचायझी लिनची साथ सोडू शकते. तथापि, लिन बिग बॅश लीगच्या सुरु असलेल्या हंगामात सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत 145.99 च्या सरासरीने 6 सामन्यांत 273 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत मुंबईने रिलीज केल्यास त्याला लिलावात नक्कीच खरेदीदार सापडेल.
2. मिचेल मॅकक्लेनाघन (Mitchell McClenaghan)
न्यूझीलंडच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने गेल्या अनेक वर्षांत मुंबई इंडियन्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु 2020 हंगामात ट्रेंट बोल्टने त्यांच्या विजयात मुख्य भूमिका निभावल्याने मॅकक्लेनाघनला रिलीज करण्याची शक्यता वाढली आहे. 2019 मध्ये मॅकक्लेनाघनने फक्त 5 मॅच खेळले आणि तीन विकेट्स घेतल्या, मात्र गेल्या हंगामात त्याला एकही सामना मिळाला नाही. लसिथ मलिंगा परत येण्याची शक्यता आणि शेरफेन रदरफोर्ड संघात असल्याने किवी गोलंदाज एमआयमधून बाहेर पडणारा दुसरा परदेशी खेळाडू ठरू शकतो.
3. सौरभ तिवारी (Saurabh Tiwary)
आश्चर्य म्हणजे सौरभने प्लेइंग इलेव्हनमध्ये ईशान किशनपूर्वी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीचा मान मिळवला परंतु मुंबई संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्याला फारशी प्रभावी कामगिरी करता अली नाही. सौरभने मागील हंगामात 7 सामन्यात 103 धावा केल्या. मुंबईने मागील हंगामात त्याला 50 लाख रूपांत खरेदी केले, मात्र यंदा कदाचित आगामी लिलावासाठी काही निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी मुंबई त्याला रिलीज करू शकते.
आयपीएलच्या 2021 लिलावापूर्वी मंडळाने शुक्रवारी सर्व फ्रँचायझींना त्यांचे सर्व कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी 20 जानेवारीपर्यंत फायनल करण्याचे आदेश दिले आहे. आयपीएलचा मिनी-लिलाव यंदा फेब्रुवारी महिन्यात आयोजित होण्याची चर्चा सुरु आहे मात्र यावर अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.