मुंबई इंडियन्स युएईसाठी रवाना (Photo Credit: Twitter/@mipaltan)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 सुरु होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक आहे आणि सर्व खेळाडू युएई येथे रवाना होत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स युएईला पोचणारी पहिली आयपीएल (IPL) टीम बनली तर चार वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) देखील युएई सफारीसाठी तयार आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पांड्या ब्रदर्स, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांचे फोटो करून संयुक्त अरब अमिराती येथे रवाना होण्याची माहिती दिली. या फोटोमध्ये कृणाल (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya), सूर्यकुमार आणि पत्नी PPE किट घालून उड्डाणासाठी सज्ज असल्याचे दिसत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने कोविड-19 मानदंडांदरम्यान सावधगिरीचा उपाय म्हणून टीमसोबत दुबईला पोहचले असता कोलकाता नाईट रायडर्स संध्याकाळी थोड्या वेळाने राजधानी अबू धाबी येथे दाखल झाले. (IPL 2020: UAE मध्ये कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ; BCCI कडून खेळाडूंना COVID-19 Protocols चे काटेकोर पालन करण्याच्या सूचना)

या शिवाय, मुंबई इंडियन्सने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्माची मुलगी समायरा, वडिलांची बॅग भरताना दिसत आहे. मुंबईसोबत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू देखील शुक्रवारी युएईमध्ये दाखल होतील तर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे इतर दोन संघ शनिवार व रविवार दरम्यान युएईमध्ये दाखल होतील. बीसीसीआय सेफ्टी प्रोटोकॉलनुसार प्रस्थान करण्यापूर्वी आधीच अनेकदा टेस्ट घेण्यात आलेल्या खेळाडूंचा आता 1, 3 आणि 6 रोजी आणखी टेस्टसह त्यांना सहा दिवसांचा क्वारंटाइन प्रक्रियेतून जावे लागेल.

PPE किट सोबत तयार

सुरक्षा पहले!

मुंबई इंडियन्स

समायरा

आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी होणार असून पहिला सामना गेतजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला जाईल. मुंबईचा कर्णधार रोहितने यापूर्वी एमएस धोनीसाठी एक पोस्ट शेअर करत '19 तारखेला टॉस दरम्यान भेटू' अशा कॅप्शनने पोस्ट शेअर केली होती.