इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 साठी अवघा एक महिना शिल्लक आहे आणि संघ आधीच युएईमध्ये (UAE) येऊ लागले आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत या लीगच्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन केले जाईल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर थोड्या वेळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएल (IPL) खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल झालेल्या खेळाडू आणि संघ कर्मचार्यांना काही प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. देशांतर्गत आणि परदेशातील सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 5 टेस्ट करून घ्याव्या लागतील. जैव-सुरक्षित बबलमध्ये प्रवेश केल्यावर खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांची दर 5 व्या दिवशी टेस्ट केली जाईल. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) स्टार शेन वॉटसन (Shane Watson) युएई येथे दाखल होणार टीमचा पहिला खेळाडू आहे आणि त्याने युएईमध्ये आल्यावर तातडीने खेळाडूंना काय करावे लागेल याची झलक दिली. (IPL 2020 Update: UAE येथे रवाना होण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, PPE किट घालून पांड्या ब्रदर्स, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा तयार See Pics)
युएईला पोहोचणार्या सीएसकेच्या पहिल्या सदस्यांपैकी एक वॉटसनला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे जेथे तो 7 दिवस क्वारंटाइन राहणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलूला त्याच्या हॉटेल रूममधून बुर्ज खलिफाच्या नाईट व्ह्यूचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहे. तो म्हणाला की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा आयपीएल वेगळा होता. कोरोना व्हायरस दरम्यान खेळाडूंना अनेक प्रोटोकॉल्सचे पालन करावे लागणार आहे.
My 7-Day room bound quarantine here in Dubai has just started. It’s so cool to be here to get into the preparation for another exciting season of @IPL for @ChennaiIPL. #SafetyFirst #WhistlePodu #superexcited pic.twitter.com/0cdrkv0oCK
— Shane Watson (@ShaneRWatson33) August 21, 2020
दरम्यान, युएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नईने भारतीय खेळाडूंसाठी 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. आयपीएलचे सामने अबूधाबी, दुबई आणि शारजाह स्टेडियममध्ये येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळले जाईल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची आणखी एक तुकडी, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्यासह शुक्रवारी चेन्नई युएईला रवाना होणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे ऑफस्पिनर हरभजन सिंह एका आठवड्यात नंतर युएईमध्ये संघात सामील होईल. सीएसकेचा स्पर्धेतील सुरुवातीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होण्याची शक्यता आहे.