रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 ची तारीख व ठिकाण निश्चित झाल्यानंतर सर्व संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेची 13 वी आवृत्ती 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. भारतातील कोरोना व्हायरस स्थिती लक्षात घेता यंदा आयपीएल (IPL) हे संपूर्ण युएईमध्ये (UAE) होणार आहे. या महिन्याच्या सुरूवातीला, बीसीसीआयला केंद्र सरकारकडून या स्पर्धेला देशाबाहेर हलवण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. आता आठही फ्रँचायझी संयुक्त अरब अमिरातीला (United Arab Emirates) रवाना होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. बीसीसीआयने यापूर्वीच संघांना 20 ऑगस्टनंतरच देश सोडण्याची माहिती दिली आहे. आणि 20 ऑगस्टनंतर फ्रँचायझी युएईच्या प्रवासासाठी वेळ वाया घालवायच्या मूडमध्ये दिसत नाही. 'द टेलीग्राफ'च्या वृत्तानुसार, यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची तयारी सुरू करण्यासाठी युएईला पोहोचणार्‍या पहिल्या संघात कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) समावेश असेल. (IPL Title Sponsorship: आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी एकूण 5 निविदा; Tata Sons चादेखील समावेश)

बातमीनुसार, दिनेश कार्तिक याच्या नेतृत्वातील फ्रँचायझी भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह 20/21 ऑगस्ट रोजी मुंबईच्या बाहेर जाणार आहेत आणि ग्रँड कॅनालमधील रिट्ज-कार्ल्टन अबू धाबी येथे थांबतील. 57 एकरात पसरलेल्या हॉटेल ग्रँड कॅनालमध्ये नाइट रायडर्स आयपीएलच्या निकषांनुसार जवळपास संपूर्ण मालमत्ता आरक्षित ठेवली जाईल अशी अपेक्षा आहे. सराव सत्रात उपस्थित असणारे खेळाडू आणि संघ समर्थन कर्मचारी यांना जैव-सुरक्षित वातावरणात प्रोटोकॉलनुसार काळ करावे लागेल. युएईला पोहोचल्यानंतर त्यांना सहा दिवसांच्या क्वारंटाइन प्रक्रियेमधून जावे लागेल.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज देखील याच दिवशी युएईला रवाना होणार आहेत. दोन्ही फ्रेंचायझी 21 ऑगस्टला युएईला पोहचतील. मुंबई इंडियन्स सेंट रेजिस, सादियात आयलँड (अबू धाबी) येथे मुक्कामी असेल तर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील फ्रँचायझी ताज दुबई येथे राहातील. सध्या चेन्नई सुपर किंग्जने चेन्नई येथे फ्रँचायझीच्या भारतीय खेळाडूंसमोर प्री-सिझन शिबिराचे आयोजन केले आहे. तर, मुंबई इंडियन्सच्या घरातील खेळाडूंनी यापूर्वीच नवी मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कॉर्पोरेट सुविधेत सर्व करण्यास सुरवात केली आहे. सोमवारपर्यंत उर्वरित भारतीय खेळाडू एकत्र येण्याची शक्यता आहे.