प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter @IPL/File)

IPL Title Sponsorship: आयपीएलच्या प्रायोजकत्वसाठी आज अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी एकूण 5 निविदा आल्या. कालपर्यंत टाटा कंपनीचे नाव आयपीएलच्या प्रायोजकत्वच्या शर्यतीमध्ये नव्हते. मात्र, टाटा सन्स या कंपनीने आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी आपण उत्सुक असल्याचे दाखवून दिले आहे.

आयपीएलच्या प्रायोजकत्वसाठी याअगोदर पतंजली, जिओने भाग घेतला होता. यात आता टाटा सन्स कंपनीचीदेखील भर पडली आहे. टाटा सन्स ही भारतातील सर्वात जुनी कंपनी असून बीसीसीआय टाटाला आयपीएलचे प्रायोजकत्व देण्याची शक्यता नाकारता येत नाही. (हेही वाचा -पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आयपीएल खेळणार? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण)

दरम्यान, विवो कंपनीने आयपीएलचे प्रायोजकत्व काढून घेतले आहे. त्यामुळे बीसीसीआयला मोठं नुकसान होणार आहे. विवो ही कंपनी दरवर्षी आयपीएलला 440 कोटी रुपये देत होती. मात्र, यंदा विवोने हा करार रद्द केला आहे. यापूर्वी आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी पतंजली, जिओ, बायजू, अनअॅकॅडमी या कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली होती.

टाटा सन्स या कंपनीला सध्याच्या घडीला आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी 250- 300 कोटी रुपये मोजावे लागू शकतात. याशिवाय इतर चार कंपन्या आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी किती रुपये मोजायला तयार होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.