इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 13 वी आवृत्ती 26 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकेल. 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआयने (BCCI) प्रसिद्ध टी-20 लीग संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आयोजित करण्याचे निश्चित केले, परंतु टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुख्य ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सची (Star Sports) आयपीएल (IPL) खेळवण्यावर नाराजी आहे. याप्रकारे सर्वोच्च संस्था स्टारला एक पर्याय उपलब्ध म्हणून 19 सप्टेंबरपासून आयपीएल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि शिवाय, संध्याकाळच्या खेळाची वेळही कमी होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या खेळाचे खेळ रात्री 8 ऐवजी अर्धातास आधी 7:30 वाजता सुरू होऊ शकतात. तत्पूर्वी, आयपीएलचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी ANI ला लीगची 13 वी आवृत्ती युएईमध्ये आयोजित केली जाण्याची पुष्टी केली. “कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल 2020 आता युएईमध्ये होणार आहे,” पटेल यांनी म्हटले. (IPL 2020 पूर्वी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकामध्ये रंगणार तीन टी-20 सामन्यांची मालिका, BCCI अधिकाऱ्याने दिले अपडेट)
याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासंदर्भात गव्हर्निंग कौन्सिल येत्या काही दिवसांत बैठक घेणार असल्याचेही पटेल म्हणाले. “अद्याप तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत आणि येत्या सात-दहा दिवसांत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल,” ते म्हणाले. तसेच अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथील तिन्ही स्थळे या कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची पुष्टीही त्यांनी केली परंतु चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल का असे विचारले असता पटेल म्हणाले की, ‘हे सर्व युएई सरकारवर अवलंबून आहे’.
आयपीएलची 13 वी आवृत्ती मार्च 29 ते 24 मे दरम्यान भारतात खेळवली जाणार होती, पण कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे आणि त्यानंतरच्या जागतिक लॉकडाऊनमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची पहिली वेळ नाही. 2014 मध्ये स्पर्धेचा अर्धा भाग युएई येथे आयोजित करण्यात आला होता. अधिकृत तारखांचा निर्णय अद्याप बाकी असला तरी बीसीसीआयने नोव्हेंबरच्या सुरूवातीस ही स्पर्धा संपवायची आहे, जेणेकरुन येत्या 3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडू वेळेवर रवाना होऊ शकतात.