आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Instagram)

IPL 2020 Prize Money: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चा हंगाम अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. 13 व्या हंगामातील आता फक्त दोन सामने शिक्कल आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यापूर्वीच फायनलमध्ये स्थान मिळवले असून त्यांना दुसऱ्या टीमची प्रतीक्षा आहे. मात्र, यंदा आयपीएलच्या विजेत्या (IPL Winner) संघाला कोविड-19 चा फटका बसणार आहे. मार्च महिन्यात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI) आयपीएल 2020 च्या बक्षिसाच्या रकमेत (IPL 2020 Prize Money) कपात करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल 2020 च्या विजेत्यास आयपीएल 2019 जिंकून मुंबई इंडियांनी मिळवलेल्या रकमेच्या 50% रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. मार्च महिन्यात बीसीसीआयने कोरोना व्हायरसमुळे कठोर कपात करण्याचा उपाय केला होता. बीसीसीआयने मार्च महिन्यातच सर्व फ्रँचायझींना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली. बीसीसीआयच्या परिपत्रकानुसार तब्बल 20 कोटीऐवजी यंदा 2020 चॅम्पियन संघाला आता फक्त 10 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. (SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: SRHचा विजयी चौकार! 6 विकेटने विजय मिळवत क्वालिफायर-2 मध्ये मिळवला प्रवेश, RCBच्या प्रवासाला लागला ब्रेक)

याशिवाय, उपविजेत्या संघाला 12.5 कोटी ऐवजी 6.25 कोटी रुपये मिळतील. पराभूत झालेल्या दोन क्वालिफायर संघांना प्रत्येकी 4.375 कोटी दिले जातील. विशेष म्हणजे, बीसीसीआयने यंदा ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, उदयोन्मुख खेळाडूंना दिली जाणारी रक्कम जाहीर केली नाही. मात्र, 2019 गेल्या वर्षी ऑरेंज कॅप विजेता (सर्वाधिक धावा) आणि पर्पल कॅप विजेता (सर्वाधिक विकेट) यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात आले होते. “खर्चात कपात करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून आर्थिक बक्षिसे परत आणली गेली आहेत. चॅम्पियन्सला 20 कोटीऐवजी 10 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्यांना पूर्वीच्या 12.5 कोटी रुपयांवरून 6.25 कोटी रुपये मिळतील," PTI कडे असलेल्या बीसीसीआयच्या सूचनेत म्हटले आहे.

सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या केएल राहुल सर्वाधिक धावांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 27 विकेटसह सध्या पर्पल कॅप काबीज केली आहे. तथापि, डीसीचा कगिसो रबाडा आतापर्यंत 25 विकेट घेत बुमराहच्या मागे आहे. या व्यतिरिक्त, इतर बरीच बक्षिसे देण्यात येतात. हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू, हंगामातील गेम चेंजर, स्टायलिश खेळाडू, हंगामातील कॅच इत्यादी आणि यांची बक्षिसाची रक्कम 10 नोव्हेंबर 2020 रोजीच कळेल.