RR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत आहे. गेल्या रविवारी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. त्या सामन्यात चार वेळा आयपीएल विजेत्या टीमने विजय मिळविला असला तरी आता आज, 25 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) सामन्यात रोहित शर्मा खेळू शकणार नाही, हे आता समोर येत आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, टीम मॅनेजमेंट बुधवार अबू धाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) पुढील सामन्यात नियमित कर्णधार रोहितच्या पुनरागमनाचा विचार करीत आहे, असे समजले जात आहे. याचा अर्थ की दुखापतीपासून त्याला दहा दिवसांचा ब्रेक मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएल (IPL) 2020च्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्यासह ऑस्ट्रेलिया दौर्यावर लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत रोहित 100 टक्के फिट नसताना रोहितने उतरावेसे कोणालाही वाटणार नाही. (MI vs RR, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर )
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे रोहितची दुखापत व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे कारण आता तो सर्वच प्रकारात राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग आहे. याआधी रोहित काल्फ दुखापतीमुळे वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यावरून मायदेशी परतला होता. पाचव्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात त्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो वनडे आणि कसोटी मालिका खेळू शकला नाही आणि त्या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. 23 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितच्या डाव्या पायाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असल्याचे पण तो त्यातून सावरत असल्याचे म्हटले होते.
IPL 13: MI skipper Rohit Sharma doubtful for Rajasthan Royals game
Read @ANI Story | https://t.co/wfiTIXoYk9 pic.twitter.com/FX5rIl7UDm
— ANI Digital (@ani_digital) October 25, 2020
दुसरीकडे, बीसीसीआय टीमशी बोलणी केल्यानंतर ते रोहितच्या उपस्थितीबद्दल विचार करतील ज्याला एक दिवस झाला आहे, पण आता राजस्थान रॉयल्सविरूद्ध तो मैदानात उतरणार नसल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत रोहितच्या अनुपस्थित पुन्हा एकदा कीरोन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसेल.