MI vs RR, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना रविवारी मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होणार आहे. प्ले-ऑफ शर्यतीत टिकून राहण्यासाठी रॉयल्सला आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे, तर मुंबई इंडियन्स संघाकडे विजय नोंदवून प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्था रॉयल्स यांच्यातील आजचा सामना 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: ‘प्रिय व्यक्तीच्या निधनाने दु:ख होतं पण...,’ मनदीप सिंह, नितिश राणा यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सलाम)
मुंबई इंडियन्स दहा सामन्यात सात विजय आणि तीन पराभवानंतर 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या सामन्यात विजय मिळवून त्यांना दोन गुण मिळतील आणि 16 गुणांसह त्यांचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, 11 सामन्यांत चार विजय आणि सात पराभवांसह राजस्थान आठ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजय त्याला प्लेऑफ शर्यतीत ठेवतील, पण क्वालिफाय करण्यासाठी त्यांना नंतरचे सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे.
पाहा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघ
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफने रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मॅकक्लेनाघन, प्रिंस बलवंत राय सिंह आणि अनुकूल रॉय.
राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, मयंक मारकंडे, महिपाल लोमरोर, ओशाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयसवाल, अनुज रावत, आकाश सिंह, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर, जोस बटवर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम कुरन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी.