एमएस धोनी, सीएसके कर्णधार (Photo Credit: PTI)

IPL 2020: मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएल (IPL) विजेते चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Super Kings) 10 गडी राखून विजय मिळवत सीएसकेला (CSK) 2020 हंगामातील आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वातील संघ आयपीएलच्या 8-संघांच्या गुणतालिकेत तळाशी आहेत आणि त्यांच्या प्ले ऑफ फेरी गाठण्याची शक्यता देखील जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सामन्यानंतरच्या सादरीकरण सोहळ्यात धोनी म्हणाला की अशा पराभवामुळे 'दुःख' झाले आहे. या हंगामात नशीबही सीएसकेच्या अनुकूल नाही. पुढे, 39-वर्षीय थालाने म्हटले की, पुढील सत्रासाठी चेन्नईस्थित फ्रँचायझीसमोर "स्पष्ट चित्र" असणे आवश्यक आहे. पण चाहत्यांनी यापूर्वीच 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्तीचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आणि मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) अष्टपैलू हार्दिक (Hardik Pandya) आणि क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) यांना भारताच्या माजी कर्णधाराने स्मृतिचिन्ह म्हणून सीएसके जर्सी भेट दिली. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यानंतर धोनीने खेळाडूंना आपली जर्सी भेट दिली. (IPL 2020: CSK कर्णधार एमएस धोनीने 200व्या आयपीएल सामन्यानंतर RR हिरो जोस बटलरला दिली खास गिफ्ट, पाहा फोटो)

आयपीएलने याबाबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. धोनीकडून स्मृतिचिन्ह म्हणून जर्सी दिल्या जात असल्याने चाहत्यांना काळजीत पडले आहे आणि आयपीएलचा यंदाचा सीजन त्याचा शेवटचा हंगाम आहे का? असा अंदाज बांधला जात आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांची उत्सुकता दर्शविली.

आणखी एक

आयपीएलमधूनही निवृत्ती?

शेवटचा

यावर्षी सीएसके संघ आयपीएल गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचे व्यवस्थापन संघातील वरिष्ठ खेळाडूंवर नाराज असल्याचे असंख्य अहवाल समोर आले आहेत. धोनीच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. संघाने आतापर्यंत 11 खेळ खेळले आहेत आणि त्यापैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत.