इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या मोसमात गतजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) मुंबईने 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि सलग सहावा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. कोलकाताने दिलेल्या 149 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने अगदी सहज विजय मिळवला. मुंबईचा सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) 44 चेंडूत नाबाद 78 धावांची वादळी खेळी केली. डी कॉकच्या प्रयत्नांमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डही मिळाला. तथापि, डी कॉकने योग्य काम केले नाही अशी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे फलंदाजी करताना त्याने योग्य ट्राउझर्स त्याने घातले नाही. इतकंच नाही तर डी कॉकने प्रॅक्टिसमधील पँटमध्ये संपूर्ण डाव फलंदाजी केली ज्यामुळे फ्रँचायझी नाराज असल्याचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी सामन्यानंतर दिली. (MI vs KKR, IPL 2020: क्विंटन डी कॉकचे दमदार अर्धशतक, MIने नाईट रायडर्सवर 8 विकेट्सने मात करत लगावला विजयाचा षटकार)
डी टॉकला त्याच्या ट्राऊजर्सवरील केशरी पट्टे लपवण्यासाठी वारंवार जर्सी खाली खेचावी लागली. मुंबई इंडियन्सने याबाबतचा खुलासा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर शेयर केला. या व्हिडिओमध्ये मुंबईचे प्रशिक्षक जयवर्धने हसत हसत “पुन्हा असं करू नकोस', कारण मार्केटिंगच्या माणसांना हे चालणार नाही. जर ते कार्य करत असेल तर ते कार्य करते परंतु आम्ही काहीतरी दुसरे क्रमबद्ध करू,” असं त्याला सांगताना दिसत आहेत. दरम्यान, डी कॉकने सरावासाठीची पँट घातली असल्याचं पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मालाही हसू अनावर झालं. डी कॉक या मोसमात मुंबईचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे. 8 सामन्यात त्याने 151.97 च्या स्ट्राईक रेटने 269 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. डी कॉकने या मोसमात आजवर 11 षटकार आणि 26 चौकार मारले आहेत.
🚨 Milestone alert 😋
Last night, Quinton de Kock became the first #MI player to play an @IPL match in his 𝕥𝕣𝕒𝕚𝕟𝕚𝕟𝕘 𝕥𝕣𝕠𝕦𝕤𝕖𝕣 👖😂#OneFamily #MumbaiIndians #Dream11IPL @MahelaJay pic.twitter.com/TYjJfv6K2j
— Mumbai Indians (@mipaltan) October 17, 2020
पहिल्या चार सामन्यात अवघ्या 48 धावा केल्यावर डी कॉकला सूर गवसला आणि त्याने पुढील चार सामन्यात 221 धावा केल्या. केकेआरविरुद्ध विजयमुंबईचा 6वा तर सलग पाचवा विजय होता. त्यांनी 8 सामन्यात 6 विजय आणि 2 पराभवाने 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सपुढे पहिले स्थान मिळवले आहेत.