कोरोना व्हायरने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे विविध स्तरातून महत्वाच्या परिक्षा आणि खेळांचे सामने रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर क्रिकेट सामन्यांमधील सर्वाधिक उत्सुकता लावणाऱ्या प्रिमियम लीग 2020 (IPL 2020) ला आजपासून सुरुवात होणार होती. तर पहिला सामना रोहित शर्मा (Rohit Sharma) याची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि एम एस धोनी (MS Dhoni) याची चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यामध्ये खेळवला जाणार होता. हा सामना वानखेडे येथे खेळवला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएल 2020 चे सामन्याचे वेळापत्रक बदलले असून 15 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. यामुळे आयपीएलच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची निराशा मात्र नक्कीच झाली असणार आहे. पण मुंबई इंडियन्सचे सोशल मीडिया अॅडमिन चाहत्यांना प्रोत्साहित करत असून आज आयपीएलचा पहिला सामना सुरु होत असल्याचे भासवत होते. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स खेळण्यासाठी सज्ज अशा प्रकारचे ट्वीट त्यांनी केले होते.
मुंबई इंडियन्स संघाचा सोशल मीडियावरील अॅडमिनने आयपीएलच्या चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वारंवार अपडेट्स आणि कॉमेन्ट्री सारखे त्यांना भासवले जात होते. त्यामुळे युजर्सकडून सुद्धा या प्रयत्नात उडी घेत त्यात सहभागी होत आज खरच आयपीएलचा सामना सुरु असल्याचे दाखवून देत ट्वीट करण्यास सुरुवात केली.(COVID-19: कोरोना विरुद्ध लढण्यासाठी BCCI चा मदतीचा हात; पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन निधीत 51 कोटींचे योगदान)
🕢 It's toss time at the Wankhede 😭😩#OneFamily #MIvCSK
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
Match time:
Don't worry, Paltan! We've still got a game at 8 PM tonight!
Watch this space for more...⏳#OneFamily #MIvCSK
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
Updates
2.1 ➡ Vijay ☝
2.2 ➡ Raina ☝
2.5 ➡ Badrinath ☝
Who bowled this over during the 2013 IPL #MIvCSK match at the Wankhede?#OneFamily pic.twitter.com/gQRL5V7Ig2
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसची देशातील परिस्थिती पाहता येत्या 15 एप्रिल पर्यंत पुढे ढकलले आयपीएलचे सामने होतील की नाही याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच आयपीएलचे सामने रद्द होण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांनी यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे.