COVID-19: कोरोना विरुद्ध लढण्यासाठी BCCI चा मदतीचा हात; पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन निधीत 51 कोटींचे योगदान
BCCI Office (PC - IANS)

देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज 900 च्या पार गेली आहे, साहजिक यामुळे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत देशाच्या आर्थिक बाजूवर सर्वात जास्त जोर पडत आहे, अशावेळी धार्मिक संस्था, उद्योगपती, सेलिब्रिटी मंडळी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय (BCCI) तर्फे सुद्धा तब्बल 51 कोटींचा मोठा निधी आज कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारला देण्यात आला आहे. पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन निधी (PM Disaster Management Fund) मध्ये बीसीसीआयतर्फे हे योगदान देण्यात आले. Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत जाहीर

प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी शिर्डी साईबाबा संस्थान, सिद्धिविनायक मंदिर संस्थान, अनेक कलाकार यांनी कोट्यवधी रुपयांची मदत देऊ केली होती, तर सामान्य नागरिकांनी सुद्धा आर्थिक मदत देण्याची उच्च व्यक्त केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून PM केअर्स फंड ची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार योगदान देऊ शकणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी हे संकट रोखण्यासाठी नागरिकांनी घरात राहून निदान स्वतःचे रक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे, यासाठीच 14 एप्रिल पर्यंत देशातील सर्व राज्य लॉक डाऊन करण्यात आली आहेत. कोरोनाचे रुग्ण बाधत असले तरी सोबतच यातून ठणठणीत बरे होणाऱ्यांची संख्या देखील आश्वासक आहे.