कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी देशातील बडे उद्योगपती पुढे येत आहेत. तर यापूर्वी रिलायन्स ग्रुपकडून 100 बेडचे कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटल उभारले असल्याचे समोर आले होते. तसेच काही स्वयंसेवी संस्था सुद्धा कोरोना व्हायरसच्या रुग्णांना आणि नागरिकांना मदत करण्यासाठी हात पुढे करत आहेत. तर आता टाटा ट्र्स्टकडून (Tata Trusts) कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी याबाबत माहिती दिली असून अत्यावश्यक सेवासुविधांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा असे ही त्यांनी म्हटले आहे. गेल्याच याआधी मेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मदतीसाठी दिला होता. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी सुद्धा त्यांची एक महिन्याचा पगार देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
कोरोना व्हायरसचे देशावरील संकट दूर करण्यासाटी सर्व रुग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. हे लोक आपल्या आरोग्यापेक्षा कोरोनाबाधितांवर योग्य उपचार करण्यामागे लागले आहेत तसेच डॉक्टर पेशी लोकांना दोनवेळचे पुरेसे जेवण आणि झोप ही मिळत नाही आहे. त्यामुळे टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलने मुंबईतील मेडिकल कर्मचारी आणि रुग्णांसाठी खाण्याची सोय केली आहे. तसेच मुंबई महानगरपालिका यांनी ट्वीट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही ताज कॅटरर्ससोबत हातमिळवणी केली असून महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि अन्य वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या खाण्याची सोय करत आहोत.(Coronavirus: कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी गावाची वाट पकडलेल्यांची महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी मदत करावी, नितीन गडकरी यांचा सल्ला)
Tata Trusts has committed Rs 500 Crores to fight #Coronavirus. Chariman Ratan Tata says, "urgent emergency resources need to be deployed to cope with the needs of fighting the COVID19 crisis." (file pic) pic.twitter.com/ZMVun8nuuQ
— ANI (@ANI) March 28, 2020
तसेच टाटा ग्रुपने यापूर्वीच देशभरातील त्यांचे ऑफिस आणि उत्पादन क्षेत्रातील काम करणाऱ्यांना संपूर्ण वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचसोबत टाटा प्रकल्पांसारख्या काही टाटा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तात्पुरते कामगार बांधकाम कामात गुंतले आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, जर एखादा कर्मचारी कोणत्याही कारणास्तव कार्यालयात आला नाही तर जणू काही लॉकडाऊनमध्ये बंद आहे तर त्या परिस्थितीतही पगार कापला जाणार नाही.