IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आर अश्विन; KXIP ला अश्विनच्या बदल्यात मिळाला 'हा' स्टार All-Rounder आणि एक कोटी रुपये
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: IANS)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर आर अश्विन (R Ashwin) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी मोसमात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळणार आहे. आईपीएलची ट्रांसफर विंडो 14 नोव्हेंबरला बंद होईल आणि आयपीएल (IPL) 2020 साठी खेळाडूंचा लिलाव पुढच्या महिन्यात 19 तारखेला होईल. अश्विनसंदर्भात पंजाब (Punjab) आणि दिल्ली फ्रँचायझीमध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे, ज्याअंतर्गत दिल्लीने पंजाबलाअश्विनच्या बदल्यात एक कोटी रुपयेआणि त्यांचा अष्टपैलू जगदीश सुचित याला देण्याचे निश्चित झले आहेत. अश्विनच्या बदल्यात पंजाबने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याचीही मागणी केली होती, पण दिल्लीने ती मान्य केली नाही. या डिलनंतरच्या टीमचा सह-मलिक नेस वाडिया (Ness Wadia) ने सांगितले की "दीर्घ काळानंतरच्या चर्चेनंतर आता सर्व खुश आहेत. आम्ही तीन संघांशी बोललो होतो आणि शेवटी दिल्लीशी करार अंतिम झाला. आम्ही अश्विनला शुभेच्छा देतो." (IPL 2020: आयपीएल खेळाडूंचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला, कोलकाता शहराला प्रथमच संधी)

अश्विनला दिल्लीतून त्याच्या लिलावासाठी केवळ 7.6 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय याची अधिकृत घोषणा 14 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे. अश्विनच्या पंजाबचे कर्णधारपद टीमचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल याला मिळण्याची शक्यता आहे. अश्विनने पंजाबकडून 28 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला आहे. अश्विनव्यतिरिक्त पंजाबने यंदा त्यांचा प्रशिक्षकही बदलला आहे. पाच वर्षांत पंजाब संघाने पाच प्रशिक्षक बदलले आहेत. अनिल कुंबळे याच्यापूर्वी माईक हेसन, ब्रॅड हॉज, वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांनी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

अश्विनच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाबने गेल्या दोन मोसमांच्या सुरूवातीला चांगली कामगिरी बजावली पण दुसऱ्या हाफमधील कामगिरी फारच खराब झाली. 2018 मध्ये संघ सातव्या क्रमांकावर होता तर 2019 मध्ये संघ सहाव्या क्रमांकावर होता. अश्विन बऱ्याच दिवसांपासून भारताच्या कसोटी संघाचा एक भाग आहे, पण त्याला वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाले नाही. मात्र त्याने नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.