IPL 2020: 'कोविड-19 ची एकही पॉसिटीव्ह केस आयपीएलला बंद होऊ शकते', KXIP चे सहमालक नेस वाडिया यांनी मांडलं मत
KXIP सहमालक नेस वाडीया (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2020 संदर्भात एसओपी जारी केला आहे. दरम्यान, आयपीएलचे मुख्य प्रायोजक 'विवो' हटविणेदेखील जवळजवळ निश्चित मानले जात आहे, ज्यामुळे बीसीसीआयसमोर आणखी एक कठीण परिस्थिती उद्भवली आहे, जे शेवटच्या क्षणी शीर्षक प्रायोजक मिळवणे असेल. या दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह-मालक नेस वाडिया यांचे मत आहे की, स्पधेर्च्या प्रायोजकांबद्दल विचार करण्यापेक्षा या स्पर्धेदरम्यान एकाही कोविड-19 सकारात्मक प्रकरण समोर न येऊ देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.  बुधवारी सायंकाळी वाडिया यांनी फ्रँचायझी मालकांच्या बैठकीत म्हणाले की, "बरेचसे अनुमान लागले जात आहेत. मला वाटते की हे सर्व बेकार आहे. आम्हाला फक्त एक गोष्ट माहिती आहे की आयपीएल होत आहे. आम्हाला खेळाडू आणि त्यात गुंतलेल्या इतर लोकांच्या सुरक्षेविषयी खूप काळजी आहे. जर एकही प्रकरण समोर आले तर आयपीएल बंद होईल." (IPL 2020 Update: आयपीएल फ्रॅंचायझींना UAE मध्ये 6 ऐवजी 3 दिवसांचा हवा आहे क्वारंटाइन कालावधी)

वाडिया म्हणाले की, जूनमध्ये पूर्व लडाख येथे भारत-चीन सैन्यामधील चकमकीनंतर आयपीएलने हळू-हळू चिनी प्रायोजकांपासून दूर झाले पाहिजे. ते म्हणाले की, गरज भासल्यास चिनी कंपनीची जागा घेण्यासाठी पुरेशी प्रायोजक आहेत. ते म्हणाले, "बीसीसीआय मुख्य प्रायोजकाबाबत काय निर्णय घेईल हे मला माहिती नाही. सर्व संघ मालकांची बैठक खूप चांगली होती आणि आम्ही सर्वांना आयपीएल यशस्वी बनवायचे आहे. आम्ही बीसीसीआयला सहकार्य केले पाहिजे आणि लवकरच पुन्हा बैठक होईल."

सध्याच्या आर्थिक वातावरणात वाडियालासंघ प्रायोजक असोत की आयपीएल प्रायोजक, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कठोर परिश्रम करतील अशीआशा आहे. ते म्हणाले, "सर्व प्रायोजक कठोर परिश्रम करतील पण आयपीएल सर्वाधिक पहिले जाईल असा मला विश्वास आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा यावर्षी प्रायोजक आयपीएलचा भाग नसल्यास ते मूर्खपणाचे ठरेल." दुसरीकडे, या स्पर्धेचे आयोजन व्यवस्थित करावे या उद्देशाने बीसीसीआयने संघांना 16 पृष्ठांची एसओपी पाठविली आहे ज्यात खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, संघाचे अधिकारी आणि मालकांना बायो सिक्युर वातावरणात रहावे लागेल. वाडिया यांनी आयपीएलसाठी युएईमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही, परंतु सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असे ते म्हणाले.