IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) यंदा सप्टेंबर महिन्यासपासून पुन्हा सुरु होणार आहे. पुढच्या महिन्यात प्रख्यात क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपुष्टात येईल जेव्हा 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) स्पर्धा खेळली जाईल. भारतीय मंडळाने प्रसिद्ध टी-20 लीग पूर्णपणे यूएईमध्ये (UAE) हलविण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय लीगचे आयोजन करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. रविवारी गव्हर्निंग कौन्सिलमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे की आगामी आयपीएलसाठी (IPL) सर्व प्रायोजक कायम ठेवले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सर्वांचे लक्ष पुन्हा वेधले ते चीनची मोबाईल कंपनी विवो (VIVO), जे आयपीएलचे मुख्य प्रायोजक आहेत. भारत-चीनमधील सीमा तणाव (India-China Border Tension) लक्षात घेत चाहत्यांनी विवोबरोबर करार कायम ठेवल्याबद्दल बीसीसीआयवर टीका केली. (VIVO to Exit From IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग 13 चे शीर्षक प्रायोजक म्हणून 'विवो'ची एक्सिट- रिपोर्ट्स)

त्यासंदर्भात मंगळवारी, VIVOने आयपीएलच्या तेराव्या आवृत्तीचे शीर्षक प्रायोजक म्हणून त्यांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले. विवोच्या बाहेर पडल्याची बातमी सोशल मीडियावर जंगलातील आगीसारखी पसरली, परिणामी नेटकऱ्यांनी बीसीसीआयला मजेदार नवीन प्रायोजक सुचवले. रिलायन्स जिओ, पतंजली आणि इतर काही ब्रँड्सची नेटकऱ्यांनी बीसीसीआयला आठवण करून दिली. पाहा 'विवो'च्या माहितीवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

जिओ आयपीएल किंवा पतंजली आयपीएल

राधिका मसाले आयपीएल

चिनी लोकांना पळवून जाण्याची वेळ आली आहे…

कायम चूर्ण

वेळ आली आहे... 

आम्हाला जिओ आयपीएल 2020 हवे आहे

बाबा रामदेवची प्रतिक्रिया

जेठालाल, नट्टू काका आणि बाघा प्रायोजित करण्याची योजना आखत आहेत

लडाखच्या गलवान सीमेवर भारत-चीनमधील संघर्ष सुरू झाल्यापासून भारतभर चीनविरुद्ध संतापजनक भावना निर्माण झाली आहे. क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला आयपीएलची सुरवात होण्याआधी चिनी प्रायोजकत्व टाळायला सांगितले. पण, आयपीएल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विवोसह अन्य चिनी प्रायोजकांना लीगच्या 13 व्या आवृत्तीसाठी मंडळाने सर्व प्रायोजक कायम ठेवल्याचे जाहीर केले. यामुळे सोशल मीडियावर प्रचंड नाराजी पसरली.