इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सीझनमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामन्यात डेविड वॉर्नरच्या हैदराबादने 15 धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत खातं उघडलं. या पराभवामुळे दिल्लीची पाहिल्यावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली तर एमएस धोनीचा (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ देखील पॉईंट्स टेबलच्या थेट अंतिम स्थानी पोहचला आहे. धोनीची सुपर किंग्स खराब रन रेटमुळे आणि तिनपैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत तळाशी पोहोचली आहे. एसआरएच (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये बदल झाल्यावर आणि जवळजवळ एका दशकानंतर धोनीची टीम गुणतालिकेत तळाशी पोहचलेली पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर विनोदी मिम्स शेअर करून सीएसकेला (CSK) ट्रोल करण्यास सुरुवात केली. (IPL 2020 Points Table Updated: सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत खाली घसरला; पाहा इतर संघाची स्थिती)
दोन पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद तळाशी होते पण दिल्लीविरुद्ध विजयानंतर त्यांना दोन स्थानाचा फायदा झाला आणि सहावे क्रमांकावर स्थान मिळवले. दरम्यान, सीएसके गुणतालिकेत अंतिम स्थानी असली तरी ते पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे. एकीकडे काही यूजर्स सीएसकेला ट्रॉल करत आहे, तर पुढील सामन्यात ते पुनरागमन करतील अशी अशा देखील अनेक यूजर्स व्यक्त करत आहेत.
होमीइज
Gautam Gambhir and homies partying after seeing Dhoni's team at the bottom- pic.twitter.com/SoeZ1ZpzY2
— Mojo (@Singhlicious) September 29, 2020
सीएसके
*When Everyone Starts Blaming 2020 for CSK Being At Bottom Of The Table*
.
.
2020:- pic.twitter.com/9Lt1etgxnX
— MeeAbhayyyy (@MeAbhayyyy) September 30, 2020
सीएसके पॉइंट टेबलच्या तळाशी
CSK at the bottom of points table 😭 pic.twitter.com/8m9mKKSSez
— Sagar (@sagarcasm) September 29, 2020
सीएसके फॅन्स
*CSK fans when someone says*
CSK top pe hai niche se pic.twitter.com/y3O4xrwinw
— 々Er.TANGENT々🇮🇳 (@pra_tea_k) September 30, 2020
या क्षणी पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राजस्थानचा संघ आहे ज्यांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांचे चार गुण आहेत. तर तीन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण मिळवत दिल्ली कॅपिटल्स दुसर्या स्थानावर आहे. बेंगलोरचे देखील तीन सामन्यांपैकी 4 गुण आहेत. चेन्नई व्यतिरिक्त आतापर्यंत पंजाब, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता संघाचे दोन गुण असले तरी त्यांचा रन-रेट सीएसकेपेक्षा सकारात्मक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, सीएस विजयाच्या दोन दावेदारांपैकी एक आहे, परंतु संघाच्या कामगिरीने आतापर्यंत निराशा केली आहे. दरम्यान, सीएसकेचा पुढील सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल.