कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीग यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला होता. या सामन्यात हैदराबादच्या संघाने मुंबईवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. ज्यामुळे आयपीएल 2020च्या गुणतालिकेत पुन्हा हालचाली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच या स्पर्धेत यापुढे अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. यामुळे कोणता संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणार? आत्तात यावर चर्चा करणे चुकीचे ठरेल.
आयपीएलच्या पहिल्या दहा सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्रत्येकी 2 विजयांसहीत 4 गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल्स पेक्षा सरस असल्याने राजस्थान अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, हैदराबाद हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर बंगळरू, चौथ्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाब, पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स, सहाव्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद, सातव्या क्रमांकावर कोलकाता नाईट राईडर्स आहे. आठव्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे. हे देखील वाचा-DC Vs SRH, IPL 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय; 15 धावांनी दिल्ली कॅपिटल्सला केले पराभूत
ट्विट-
A look at the Points Table after Match 11 of #Dream11IPL. pic.twitter.com/NT3MW4O7fS
— IndianPremierLeague (@IPL) September 29, 2020
आज 30 सप्टेंबर रोजी रॉजस्थान रॉयलचा संघ आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना अबुधाबी आंतरराष्ट्रीय पार पडणार आहे. राजस्थानच्या संघाने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर, कोलकाताच्या संघानेदेखील सामने खेळले आहेत. दरम्यान, कोलकाताच्या संघाने एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.