आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

आयपीएलच्या (IPL) आठ फ्रॅन्चायसींमध्ये सोमवारी टेलि-कॉन्फरन्स दरम्यान यंदा इंडियन प्रीमिअर लीगबद्दल (Indian Premier League) कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. गेल्या 48 तासांत भारत आणि जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) साथीचा रोग पसरल्यामुळे कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी आयपीएल 200 ची सुरुवात 29 मार्च रोजी होणार होती, पण आता 15 एप्रिलपर्यंत स्पर्धा स्थगिती करण्यात आली आहे. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूने 110 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोन व्यक्तींनी जीव गमावला आहे. शिवाय, सर्व विदेश व्हिसाही 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या स्वरूपात यंदा काही बदल होण्याचेही संकेत दिले. स्पर्धा स्थगित झाल्याने उशिरा सुरु झाल्यास सामन्यांचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. आयपीएलच्या तारखा पुढे ढकलण्याच्या आधीच स्पर्धेचे 17 दिवस वाया गेले आहेत. (IPL 2020: टीम मालकांच्या बैठकीत सामन्यांच्या कपातीसह 7 पर्यायांवर झाली चर्चा, जाणून घ्या)

आयपीएलच्या फ्रेंचायझीच्या मालकाने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “आजच्या बैठकीत कशाचाही ठोस विचारविनिमय झाला नाही. गेल्या 48 तासांत परिस्थिती बदललेली नाही, म्हणून आयपीएल आयोजित होणार की नाही यावर बोलणे फार लवकर आहे. आमच्याकडे पहा आणि प्रतीक्षा करा धोरण स्वीकारावे लागणार आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आठवड्यातून अशा परिषद बैठका घेत राहू." दरम्यान, 12 हंगामांपैकी आयपीएलची केवळ दोनदा सुरुवात मार्चमध्ये झाली आहे. कोरोनव्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही अधिकृत विभाग वगळता सर्व व्हिसा 11 मार्च रोजी स्थगित केले होते.

दुसरीकडे, या धोकादायक विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बीसीसीआयने मंगळवारपासून कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. आयपीएल फ्रॅन्चायसींनीही सराव सत्र रद्द केले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी सराव सत्र रद्द केल्याने सर्व खेळाडूं आपल्या घरी परतले आहे. शिवाय, रिक्त स्टेडियममध्ये सामने खेळवण्याची शक्यता बीसीसीआयसाठी अजूनही खुली आहे.