भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी मुंबई येथील बोर्डाच्या मुख्यालयात इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) फ्रँचायझी मालकांची भेट घेतली आणि कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या उद्रेक आणि आगामी हंगामावरील परिणाम यावर चर्चा केली. सर्व आयपीएल फ्रँचायझी (IPL Franchise) समवेत बीसीसीआयने चाहते, खेळाडू आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने भविष्यातील कृती करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोर्ड भारत सरकार, राज्य सरकार आणि इतर राज्य नियामक संस्थांशी लक्ष ठेवून आणि कार्य करीत राहील. बीसीसीआयने (BCCI) कोरोना व्हायरस, साथीच्या आजारामुळे इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सत्र एक दिवस आधी 15 एप्रिलपर्यंत स्थगित केला. शनिवारी बीसीसीआयने आठ फ्रँचायझी संघ मालकांशी बैठक आयोजित केली असून त्यात झालेल्या सामन्यांच्या संख्येवरही चर्चा झाली. (IPL गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर KKR मालक शाहरुख खान यांनी केले 'हे' ट्विट, स्पर्धेच्या पोस्टपोनमेंटवर केले मोठे विधान)
आयपीएल सामन्यांमधील कपातींसह टीम मालक आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या बैठकीत सहा ते सात पर्यायांवर चर्चा झाली, असे बैठकीनंतर गोपनीयतेच्या अटीवर बोर्डाच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले. परदेशात स्पर्धा घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. कोविड-19 मुळे जगभरात 5000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. शिवाय, किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया म्हणाले, "बीसीसीआय, आयपीएल आणि (अधिकृत ब्रॉडकास्टर) स्टार स्पोर्ट्सने हे स्पष्ट केले की आम्ही आर्थिक नुकसानीचा विचार करीत नाही."
दरम्यान, आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 80 हून अधिक नागरिक संसर्गित झाले आहेत. यानंतर, प्रेक्षकांची गर्दी टाळण्यासाठी क्रीडा स्पर्धा बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले. दरम्यान, बीसीसीआयसमोर वाट पाहणे हा एकच उपाय असल्याचे दिसते कारण कोरोना व्हायरस सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरला असून येत्या आठवड्यात आणि दिवसांत वाढून परिस्थितीत अजून बिघाड होण्याची शक्यता आहे.