कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) चे मालक आणि बॉलिवूड बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीला उपस्थित होते जिथे प्रत्येक फ्रेंचायझीचे मालक आयपीएल (IPL) 2020 च्या आगामी आवृत्तीच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. कोरोन व्हायरसच्या उद्रेकामुळे यंदा इंडियन प्रीमिअर लीगची (Indian Premier League) स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. शाहरुखने कोरोना विषाणूचा परिणाम कमी होईल आणि आरोग्याच्या सर्व आवश्यक काळजी घेऊन आयपीएल पुढे जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. आयपीएलला 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या (IPL Governing Council) बैठकीनंतर शाहरुखने ट्विट केले की सर्व फ्रेंचायझींना भेटून चांगले वाटले. शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार जे काही निर्णय घेईल, बीसीसीआयचा कोणताही निर्णय असला तरी आरोग्याची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल. किंग खानने पुढे अशीही आशा व्यक्त केली आहे की लवकरच विषाणूचा परिणाम संपुष्टात येईल आणि खेळ सुरु होईल. (IPL 2020: कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित, BCCI ने केली पुष्टी)
शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये चाहते, खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटच्या सुरक्षेचा विचार केला आहे. ट्विटमध्ये शाहरुखने लिहिले की आम्ही भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणेच्या सूचनांचा पालन करू. आम्ही सरकारशी बोलत आहोत आणि आम्ही सरकारच्या प्रत्येक टप्प्यावर आहोत असे शाहरुखने ट्विट करून लिहिले.
1/2 Wonderful to meet all the Franchise owners ‘off the field’ so to say. The meeting by @Bcci and @ipl was to reiterate what all of us feel...safety first of the spectators, players management & cities we play in. All directives of the health agencies & govt to be followed..
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 14, 2020
2/2. Hope the spread of the virus subsides & the show can go on. BCCI & team owners in consultation with the govt will keep a close watch & decide the way fwd in the health interest of ever1. Lovely 2 meet every1 & then sanitise ourselves repeatedly..@SGanguly99 @JayShah #BPatel
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 14, 2020
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) प्रशिक्षण शिबिरही तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने स्थगित केले आहे. एमएस धोनीला एम चिदंबरम स्टेडियमवर नेट्समध्ये धोनीला फलंदाजी पाहण्यासाठीदररोज शेकडो लोक एकत्र येत होते. आणि म्हणून जनसमुदाय रोखण्यासाठी सराव सत्रे थांबविण्यात आली आहेत. आत्तापर्यंत, जगभरात 1,40,000 हून अधिक प्रकरणं नोंदविली गेली आहेत. भारत सरकारच्या अहवालानुसार देशात ही प्रकरणे वाढून 83 झाली आहेत आणि आतापर्यंत दोन मृत्यूची नोंद झाली आहे.