भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सध्या कोरोना व्हायरस विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल 2020 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीसीसीआय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर सर्व संबंधित केंद्र व राज्य सरकार विभागांसह भारत सरकारबरोबर काम करेल. बहुप्रतिक्षित आयपीएलचे 13 वे सत्र 29 मार्चपासून सुरू होणार होते, परंतु कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. नवीन तारखा अजून जाहीर झाल्या नाही आहे. 15 एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूची स्थिती बदली नाही तर स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते किंवा रद्द होऊ शकते. (दिल्ली सरकारकडून कोरोना व्हायरसमुळे राज्यात IPL 2020 चे आयोजन रद्द, मनीष सिसोदिया यांनी केले जाहीर)
आगामी सीझन प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल आणि सामन्यांची संख्या कमी होणार नाही, असेही अहवालात सुचविण्यात आले होते. स्पर्धेचा पहिला सामना गतजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला जाईल. आता 15 एप्रिलपर्यंत आयपीएल सुरू होणार नाही. अलीकडेच, भारत सरकारने 11 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी मंजूर केलेले सर्व पर्यटक व्हिसा आणि ई-व्हिसा निलंबित केले होते. भारत सरकारच्या सल्ल्या नंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बोर्ड सचिव जय शाह आणि इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) उच्च अधिका्यांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
🚨Announcement🚨: #VIVOIPL suspended till 15th April 2020 as a precautionary measure against the ongoing Novel Corona Virus (COVID-19) situation.
More details ➡️ https://t.co/hR0R2HTgGg pic.twitter.com/azpqMPYtoL
— IndianPremierLeague (@IPL) March 13, 2020
यापूर्वी दिल्ली सरकारने कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने शहरात होऊ न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सद्य परिस्थिती पाहता आयपीएलला 15 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलले आहे."