IPL 2020: सनरायझर्स हैदराबाद ने 13 व्या आयपीएलपूर्वी घेतला मोठा निर्णय, डेव्हिड वॉर्नर ला दिली कर्णधारपदाची जबाबदारी
डेविड वॉर्नर (Photo Credit: IANS)

सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 29 मार्चपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 साठी ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला (David Warner) आपला कर्णधार म्हणून नेमले आहे. आगामी 13 व्या मोसमासाठी तो केन विल्यमसनची (Kane Williamson) जागा घेईल. विल्यमसनने 2018 आणि 2019 मध्ये संघाचे नेतृत्व केले होते. बॉल टॅम्परिंगच्या वादानंतर वॉर्नरला हंगामात बंदी घातली गेली असताना विल्यमसनला 2018 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. विल्यमसनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने 2018 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता जेथे त्यांना चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी विल्यमसनने स्पर्धेत सर्वाधिक 735 धावा केल्या होत्या. मागील वर्षी, एलिमिनेटरमध्ये सनरायझर्सचा दिल्ली कॅपिटल्स ने पराभव केला आणि ते लीगमध्ये चौथ्या स्थानावर राहिले होते. (IPL 2020 Schedule of Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादने जाहीर केले आयपीएल 13 चे संपूर्ण वेळापत्रक; 1 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध होईल पहिला सामना)

दरम्यान, आयपीएल 2019 मध्ये वॉर्नर हैदराबादकडून आयपीएल (IPL) खेळला आणि स्पर्धेत सर्वाधिक धावाही केल्या. वॉर्नरने यापूर्वी 2015-2017 दरम्यान संघाचे नेतृत्व केले होते आणि 2016 मध्ये सनरायझर्सला विजेतेपद जिंकवले होते. 2013 मध्ये सनरायझर्सने आयपीएलमध्ये खेळाली होती, त्या दरम्यान त्यांचा कर्णधार श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा होता. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यावरसनरायझर्सने सोशल मीडियावर वॉर्नरचा व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्याने संघ व्यवस्थापनाचे आभार मानले. वॉर्नर म्हणाला, ''मला 2020 आयपीएलसाठी कर्णधारपद मिळाल्याने खूप आनंद आहे. मी टीम मॅनेजमेंटबद्दल कृतज्ञतापूर्वक प्रयत्न करतो त्याने मला ही जबाबदारी परत दिली." पाहा व्हिडिओ:

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या वॉर्नरने सनरायझर्स संघाचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, विल्यमसनने 2018 आणि 2019 च्या हंगामात संघाचे नेतृत्व केले. वॉर्नरने गेल्या वर्षी आयपीएल खेळता असला तरी दोन वर्षांच्या बंदीमुळे त्याला संघाचे नेतृत्वाची संधी मिळाली नव्हती. वॉर्नरने सनरायझर्सचे एकूण 45 सामन्यांचे नेतृत्व केले असून त्यापैकी 26 विजय जिंकले आहेत.