IPL 2020 Schedule of Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादने जाहीर केले आयपीएल 13 चे संपूर्ण वेळापत्रक; 1 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध होईल पहिला सामना
David Warner of Sunrisers Hyderabad. (Photo Credits: IANS)

आयपीएलची (IPL 13) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13 व्या सीझनचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. हैदराबादस्थित फ्रँचायझी 1 एप्रिल रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर, मुंबई इंडियन्स विरूद्ध आयपीएल 2020 चा आपला सलामीचा सामना खेळेल.

एसआरएच आयपीएल 2020 मध्ये एकूण 14 सामने खेळणार आहे. अखेरचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 15 मे रोजी ईडन गार्डन्सवर होणार आहे. मात्र इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनच्या संपूर्ण वेळापत्रकाबद्दल अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.

एकदा आयपीएल जिंकलेल्या आणि पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या, सनरायझर्स हैदराबादने युवा खेळाडू अभिषेक शर्मा, खलील अहमद, टी नटराजन, संदीप शर्मा यांच्यासह बहुतेक संघ कायम ठेवला आहे. एसआरएचने यंदा एक टॅलेंट टीम तयार केली आहे, जे आयपीएलच्या लिलावात त्यांच्याविरुद्ध खेळल्या गेलेल्या कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणास समजण्यास पुरेसे आहे.

(हेही वाचा: IPL 2020 Schedule: आयपीएल 13 चे वेळापत्रक प्रसिद्ध? जाणून घ्या यंदाच्या Indian Premier League लढतीचे Online Leak झालेले संपूर्ण शेड्यूल)

सनरायझर्स हैदराबाद संपूर्ण संघ -

केन विलियमसन (कर्णधार), डेविड वार्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, फेबियान एलेन , विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बावनका संदीप, बासिल थम्पी.

दरम्यान, भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका संपल्यानंतर 11 दिवसानंतर, 29 मार्च रोजी आयपीएलचा 13 वा सीझन सुरू होईल. या सीझनमधील शेवटचा सामना बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान 17 मे रोजी होईल.