जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग, म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम (IPL 2020) मार्चमध्ये सुरू होईल आणि मे पर्यंत खेळला जाईल. या सीझनमधील पहिला सामना 29 मार्च रोजी खेळला जाईल, तर या लीगचा शेवटचा सामना 17 मे रोजी होईल. आयपीएलच्या या सीझनचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हा सामना वानखेडे स्टेडियमवर साधारण संध्याकाळी 7.30 ला खेळला जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई यांच्यात 17 मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये एकूण 62 सामने खेळले जातील. या सीझनमध्ये 29 मार्च, 4 एप्रिल, 5 एप्रिल, 11 एप्रिल, 18 एप्रिल, 19 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल, 2 मे, 3 मे, 9 मे आणि 10 मे रोजी दोन सामने खेळले जातील. मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
IPL 2020 SCHEDULE IS OUT 😍😍😋
MI vs CSK will be match number 1 😎 pic.twitter.com/6X6CkYzTBf
— Dhanush Reddy (@Dhanush716) February 15, 2020
या हंगामात शनिवारी एकच सामना खेळला जाईल. या वेळी आयपीएलच्या सीझनमध्ये, लीग 50 दिवस चालणार आहे. आयपीएल 2019 मध्ये एकूण 44 दिवसात लीग सामने खेळले गेले होते. दरम्यान, आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती आणि आतापर्यंत 12 सीझन खेळले आहेत. पहिला सीझन राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 मोसमात मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने 4 आयपीएल स्पर्धा जिंकल्या असून, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 3 किताब जिंकले आहेत. (हेही वाचा: आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 चे भारतीय महिला टीमचं शेड्यूल, सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या)
काही काळापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांचे संपूर्ण फिक्स्चर घोषित केले आणि इंटरनेट आयपीएलच्या चर्चेला सुरुवात झाली.