आयपीएल (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगबद्दल (Indian Premier League) मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने (BCCI) कोणत्याही परिथितीत आयपीएलचा (IPL) 13 वा सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे आयोजन करण्याबाबत विचार केला जात आहे. असे झाल्यास 24 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) बरोबरच आयपीएलचा थरार चाहत्यांना उपभोक्ता येऊ शकतो. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. हजारो जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर तितक्या लोकांना देखरेखी खाली ठेवले आहेत. भारतातही सुमारे दीडशे लोकांना याचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीग आयोजित करणे अशक्य आहे. यामुळेच बीसीसीआय आता नवीन मार्ग शोधत आहे. (IPL 2020: एमएस धोनीचं टीम इंडियात कमबॅक आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून, टी-20 लीग यावर्षी रद्द झाल्यास काय होईल, घ्या जाणून)

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार बीसीसीआयने छोट्या आयपीएलऐवजी 60 सामन्यांचे संपूर्ण आयपीएल आयोजित करण्याचा विचार करत आहे. या अहवालानुसार बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल रद्द करू इच्छित नाही आणि येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास जुलै ते सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावर बोर्ड विचार करत आहेत. 2020 च्या एफटीपीनुसार युएई मधील आशिया चषक आणि सप्टेंबरमध्ये इंग्लंड-पाकिस्तान मालिका वगळता जुलै ते सप्टेंबरमध्ये कोणतीही मोठी मालिका आयोजित होणार नाही. जर जुलैमध्ये आयपीएलचे आयोजन केले गेले असेल तर त्याचा सामना 24 जुलैपासून सुरू होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकशी होईल.

अहवालानुसार, जर आयपीएलचे आयोजन भारतात करता येत नसेल तर ते देशाबाहेरही आयोजित केले जाऊ शकते. 2009 मध्ये भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेमध्ये इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ही स्पर्धा 37 दिवसांत संपुष्टात आली होती. दरम्यान, बीसीसीआय आणि आठ फ्रँचायझी प्रतिनिधींमधील टेली कॉन्फ्रेंसिगमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. फ्रँचायझीज देखील त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा धोका पत्करायच्यामूडमध्ये नाहीत. यापूर्वी, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की लीगला 17 दिवस गमवावे लागले असल्याने एप्रिलमध्ये स्पर्धा आयोजित केल्या आयपीएल 2020 सामन्यांची संख्या कमी केली जाऊ शकते.